‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह घेणार उच्चस्तरीय बैठक

 गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार; NDRF आणि SDRF तैनात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, मंगळवारी (१३ जून) दुपारी दिल्लीत चक्रीवादळ बिपरजॉयच्या तयारीशी संबंधित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. त्यांच्यासोबत या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या आठ जिल्ह्यांचे खासदारही या बैठकीत  प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. Amit Shah will hold a high level meeting to review preparations for the Biparjoy storm

अरबी समुद्रातून उठणारे बिपरजॉय हे चक्रीवादळ १५ जून रोजी गुजरातच्या किनारपट्टी भागात पोहोचणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता पाहता गुजरात सरकारने NDRF आणि SDRF तैनात केले आहेत. मात्र, गुजरात-मुंबईच्या कोणत्या भागात हे चक्रीवादळ किती वेगाने धडकेल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून, काही तासांनंतरच त्याची स्थिती स्पष्ट होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर कधी धडकणार? –

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ते 15 जून या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या काळात येथील हवेचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत असू शकतो. हवामान खात्यानुसार, गुजरातमधील कच्छ, जामनगर, मोरबी, गिर सोमनाथ, पोरबंदर आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आपत्ती निवारण अधिकारी आलोक पांडे म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी किनारीपट्टीच्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी, लष्कर, नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी यांची बैठक घेतली आहे. पांडे म्हणाले की, किनारी जिल्ह्यांतील चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आगाऊ तयारी करून आपापसात समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Amit Shah will hold a high level meeting to review preparations for the Biparjoy storm

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात