Lok Sabha Election 2024 : यंदाही काँग्रेससाठी अमेठीची निवडणूक अवघडच; अखिलेश यादवने वाढवली डोकंदुखी!

Akhilesh yadav

काँग्रेस आपला हा गढ परत मिळवू शकेल अशी सध्यातरी कुठलीही चिन्ह दिसत नाहीत.

विशेष प्रतिनिधी

Amethi Lok Sabha : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघावर भाजपाची सत्ता आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात विजय मिळवला होता. तर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आपला हा गढ परत मिळवू शकेल अशी सध्यातरी कुठलीही चिन्ह दिसत नाहीत. कारण, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकंदुखी वाढणार यात शंका नाही. Amethi Lok Sabha election this year also difficult for Congress Akhilesh Yadav increased the difficulty

समाजवादी पार्टी मागील अनेक निवडणुकीत रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनाथ आपला उमेदवार उभा करणे टाळत आहे. अमेठीतून आतापर्यंत राहुल गांधी आणि रायबरेलीमधून सोनिया गांधींनी निवडणूक लढवली आहे. सोनिय गांधी यंदाही रायबरेलीतून काँग्रेसच्या खासदार आहेत.


उद्धव ठाकरेंकडे राहिलेले काहीजण लवकरच एकनाथ शिंदेंकडे आणि काही आमच्याकडे येतील – चंद्रशेखर बावनकुळे


रविवारी अमेठीच्या दौऱ्यावर गेलेले समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, अमेठीत गरीब महिलांची दुर्दशा पाहून अतिशय वाईट वाटत आहे. या ठिकाणी नेहमीच व्हिआयपी लोक जिंकले आणि हारले आहेत. तरी या ठिकाणी अशी परिस्थिती असेल, तर उर्वरीत राज्याबद्दल काय बोलावे. पुढीलवेळी अमेठी मोठ्या लोकांना नाही तर मोठ्या मनाच्या लोकांना विजयी करेल. समाजवादी पार्टी अमेठीचे दारिद्र संपवण्याचे संकल्प करते. अखिलेश यांनी आपल्या ट्वीटसोबत या दौऱ्यातील काही फोटोही शेअर केले आहेत.

२०१९ निवडणूकीचा निकाल काय होता? –

अमेठी लोकसभा जागेवर २०१९मध्ये प्रमुख लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात झाली होती. या निवडणुकीत सपा-बसपा यांच्यात युती होती, मात्र त्यांनी राहुल गांधींच्या बाजूने उमेदवार उतरवला नव्हता. या निवडणुकीत २०१९ लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांना ४ लाख ६८ हजार ५१४ मतं मिळाली होती. तर राहुल गांधींना ४ लाख १३ ३९४ मतं मिळाली होती. स्मृती इराणी ही निवडणूक ५५ हजार मतांनी जिंकली होती.

Amethi Lok Sabha election this year also difficult for Congress Akhilesh Yadav increased the difficulty

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात