Corona : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने कोरोना विषाणूच्या साथीसाठी दिलेली एकूण मदत 20 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. America will give additional assistance of 4 Crore Dollars to India, will help to eliminate Corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने कोरोना विषाणूच्या साथीसाठी दिलेली एकूण मदत 20 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे.
एप्रिल आणि मे दरम्यान दररोज भारतात तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळत होते. यादरम्यान रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवला. अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) यांनी सोमवारी सांगितले की, “गरज होती तेव्हा भारत अमेरिकेला मदत करण्यासाठी पुढे आला आणि आता युनायटेड नेशन्स ऑफ अमेरिका भारतीय नागरिकांच्या पाठीशी उभा आहे.”
यूएसएआयडीने कोरोना महामारीच्या आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी भारताला 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. यूएसएआयडी ही अमेरिकन फेडरल सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे, जी प्रामुख्याने परदेशात मानवतावादी मदतीसाठी कार्य करते, विकास साहाय्य पुरवते. कोरोना महामारीच्या काळात अमेरिकेने भारताला हरप्रकारे मदत केली आहे. यापूर्वी अमेरिकेनेही कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान भारताला मदत साहित्य दिले होते. गरज पडल्यास सर्व प्रकारच्या मदतीसाठी ते भारताच्या पाठीशी उभे आहेत असे अमेरिकेने म्हटले होते.
America will give additional assistance of 4 Crore Dollars to India, will help to eliminate Corona
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App