राहुल गांधी मॅटर मध्ये अमेरिका, जर्मनीचा हस्तक्षेप!!, राहुलजींकडून आभार व्यक्त; केंद्रीय कायदेमंत्र्यांचा राहुलजींना चिमटा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी मॅटरमध्ये अमेरिका, जर्मनीने हस्तक्षेप केला आहे. राहुल गांधींना तो हस्तक्षेप अपेक्षित असल्याने राहुल गांधींनी त्या दोन्ही देशांची आभार व्यक्त करणारी ट्विट केली आहेत. मात्र या मुद्द्यावरून केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी खोचक ट्विट करून राहुल गांधींच्या परकीय हस्तक्षेपाच्या आवडीवर नेमके बोट ठेवले आहे!!America, Germany Interference in Rahul Gandhi Matter!!, Thanks from Rahulji; Union Law Minister pinches Rahulji

देशातील सर्व मोदींना चोर ठरविलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षांची तुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार त्यांची खासदारकी रद्द झाली. मात्र या विषयावरून देशात जो राजकीय गदारोळ झाला, त्या मुद्द्यावर नेहमीप्रमाणे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातल्या लोकशाहीच्या मुद्द्यावर लेक्चरबाजी केली. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते किरण पटेल यांनी भारत असल्या घडामोडींवर अमेरिका लक्ष ठेवून आहे. लोकशाही संस्था आणि लोकशाही व्यवस्था यांच्याकडे अमेरिकेचे बारकाईने लक्ष आहे, असे वक्तव्य केले.



त्या पाठोपाठ जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि त्यांचे राजदूत रिचर्ड वॉकर यांनी राहुल गांधींच्या निलंबनाविषयी “विशिष्ट मत” व्यक्त केले. भारतातली लोकशाही आणि राहुल गांधींचे निलंबन हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. राहुल गांधींना भारतीय न्यायव्यवस्थेकडे जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे, ही आमची माहिती आहे. त्या मुद्द्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे रिचर्ड वॉकर यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि जर्मनी यांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी भारतातला अंतर्गत मुद्दा असलेला राहुल गांधींच्या निलंबनावर लक्ष ठेवणे आणि त्यानंतर भारतीय लोकशाही न्यायव्यवस्था यावर भाष्य करणे हा मुद्दा राहुल गांधींना आवडला आहे. त्यामुळे त्यांनी त्या देशांचे आभार मानले आहेत.

मात्र आता याच मुद्द्यावरून केंद्रीय कायदेमंत्री किरण यांनी खोचक ट्विट करून राहुल गांधींचे “आभार” मानले आहेत. भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परकीय शक्तींना निमंत्रित केल्याबद्दल मी राहुल गांधींचे आभार मानतो. पण भारतातली लोकशाही अथवा न्यायव्यवस्था कुठल्याही परिस्थितीय हस्तक्षेपाने बधणार नाही. भारत कोणताही परकीय हस्तक्षेप सहन करणार नाही. कारण आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे ट्विट किरण रिजिजू यांनी करून राहुल गांधी यांना चिमटा काढला आहे.

America, Germany Interference in Rahul Gandhi Matter!!, Thanks from Rahulji; Union Law Minister pinches Rahulji

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात