काँग्रेसमध्ये इन्कमिंग – आऊट गोईंग; कन्हैया इन, कॅप्टन आऊट; कॅप्टन अमरिंदरसिंग नड्डा – शहांना भेटणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज दोन महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये इन्कमिंग आणि आऊट गोइंग एकाच वेळेला घडताना दिसत आहेत.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्ड होल्डर नेता आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आहेत. “जनाब” कन्हैया कुमार यांचे स्वागत आहे, असे फलक दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालया बाहेर लागले आहेत.Amarinder Singh to reach Delhi today; likely to meet Amit Shah, JP Nadda

त्याच वेळी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे दिल्लीत दाखल झाले असून ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह – सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसने पंजाबमध्ये आपल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ चार दिवसांनी का होईना पण निस्तरला आहे.कालच पंजाबचे पूर्ण मंत्रिमंडळ सत्ता संभाळायला लागले आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन साहेब आता काँग्रेसला सुरुंग लावण्याच्या बेतात आहेत. त्यासाठीच ते नड्डा आणि अमित शहा यांना भेटण्याच्या बातम्या आहेत.कॅप्टन साहेब काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर असताना कन्हैया कुमार मात्र काँग्रेसमध्ये येत आहे.

त्यामुळे राहुल गांधी समर्थकांमध्ये जोश संचारला आहे. राहुल गांधी समर्थकांनी काँग्रेसच्या मुख्यालया बाहेर “जनाब” कन्हैया कुमार यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधल्या इन्कमिंग आणि आऊट गोइंगवर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.

Amarinder Singh to reach Delhi today; likely to meet Amit Shah, JP Nadda

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण