मी टू आरोपातील मंत्र्याची कॅ. अमरिंदरसिंग यांच्याकडून पाठराखण, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा

महिला आयएएस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठविणारे पंजाबचे शिक्षणमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषाा गुलाटी यांनी चंदीगडमध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.Amarinder Singh quiet on Me too of minister, warning of agitation by the chairperson of the women’s commission


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : महिला आयएएस अधिकाºयाला आक्षेपार्ह मेसेज पाठविणारे पंजाबचे शिक्षणमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषाा गुलाटी यांनी चंदीगडमध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.एका महिला आयएएस अधिकाऱ्याने २०१८ मध्ये महिला आयएएस अधिकाऱ्याने मी-टूअंतर्गत आरोप केले होते.

या महिला अधिकाऱ्याला चन्नी यांनी आक्षेपार्ह मेसेज केले होते. त्यानंतर या अधिकारी महिलेने स्वत:ची पंजाबबाहेर बदली करून घेतली होती. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी हे प्रकरण मिटले असल्याचे म्हटले आहे.

मात्र, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी पुन्हा एकदा अमरिंदर सरकारकडे उत्तर मागितले आहे. त्या म्हणाल्या की, जर एका आठवड्यात उत्तर न मिळाल्यास मी माझ्या तुकडीसह चंदीगडमध्ये धरणे आंदोलन करीन.

मनीषा गुलाटी म्हणाल्या की, वस्तुस्थिती जनतेसमोर यायला हवी. मी माझा स्वाभिमान मारून काम करू शकत नाही. माझे पद गेले तरी चालेल; पण मला सरकारकडून उत्तर हवे आहे. आयएएस अधिकाऱ्यांचा गट मी मंत्री चन्नी यांच्या सोबत आहे,

असा वारंवार फोन करून आरोप करीत आहेत, वस्तुस्थिती ही आहे की, मी चन्नी यांना ना ओळखते, ना कधी त्यांना भेटले. त्यामुळे आयएएस अधिकाºयांना आयोगाच्या कामकाजावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.

मी टू प्रकरण समोर आल्यानंतर आयोगाने ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पूर्ण अहवाल मागितला होता. तो अजून मिळालेला नाही. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले होते की, चन्नी यांनी महिला आयएएस अधिकाऱ्याची माफी मागितली आहे.

त्यानंतर राज्य सरकारने आयोगाला लेखी उत्तर दिले नाही. आता गुलाटी यांनी मुख्य सचिव विनी महाजन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, उत्तर न मिळाल्यास मला न्यायालयात जावे लागले, तर जाईन. मंत्री चन्नी यांनी या विषयावर अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Amarinder Singh quiet on Me too of minister, warning of agitation by the chairperson of the women’s commission