विशेष प्रतिनिधी
लखनऊ : समाजवादी पक्ष आणि त्याचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पाकिस्तानचे समर्थक असून मोहम्मद अली जिना यांचे भक्त आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केली. अखिलेश यांनी नुकतीच पाकिस्तान आणि जिना यांच्याबाबत टिपणी केली होती. त्यावरून योगी यांनी ही टीका केली.Akhilesh Yadav, supporter of Pakistan, devotee of Jinnah, Yogi Adityanaths accusation
आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, ते (समाजवादी पक्ष, अखिलेश) जिना यांचे भक्त आहेत. आम्ही सरदार पटेल यांचे भक्त आहोत. त्यांना पाकिस्तान प्रिय आहे, तर आम्ही भारत मातेसाठी आपल्या प्राणांचा त्याग करू. ज्या वेळी ते सत्तेत होते, त्यावेळी रामसेवकांवर गोळीबार करण्यात आला.
कावड यात्रा रद्द करण्यात आल्या. सफाई महोत्सव असावा त्याप्रमाणे त्यांनी लूटले. आम्ही सत्तेवर आल्यावर रामलल्ला विराजमानचे स्वप्न साकार झाले. कावड यात्रेकरूंवर हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. दीपोत्सव, रंगोत्सवासाठी उत्तर प्रदेश ओळखला जाऊ लागला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App