विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आज नोएडा अर्थात गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. तेथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण “नोएडा अंधश्रद्धा” तोडली असल्याचा दावा केला आहे.Akhilesh Yadav says, “I broke the Noida superstition”; But how much and what in it
नोएडा मध्ये कोणताही मुख्यमंत्री आला की त्याचे वाईट दिवस सुरू होतात आणि त्याला सत्ता गमवावी लागते, अशी ही अंधश्रद्धा आहे. 1985 सालापासून ही अंधश्रद्धा चालत आली आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग, नारायण दत्त तिवारी, कल्याण सिंग, मायावती, राजनाथ सिंह या मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वतःच्या नोएडा दौऱ्यानंतर काही दिवसांत काही महिन्यांमध्ये सत्ता गमवावी लागल्याची उदाहरणे यासाठी दिली जातात.
आज अखिलेश यादव यांनी नोएडा मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण ही अंधश्रद्धा तोडली असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता येणार आहे. मी आज नोएडात आलो आहे. 2011 मध्ये देखील मी नोएडात आलो होतो. त्यानंतर 2012 मध्ये समाजवादी पक्षाची सत्ता उत्तर प्रदेशात आली होती, याची आठवण अखिलेश यादव यांनी या पत्रकार परिषदेत करून दिली आहे.
अंधविश्वास है कि जो CM नोएडा जाता है, वो चुनाव हार जाता है, लेकिन एक मान्यता ये भी है कि जो नोएडा जाता है उसकी भी सरकार बनती है। मैंने 2011 में नोएडा से साइकिल यात्रा शुरू की और सरकार बनाई। मैं फिर से वहां जा रहा हूं क्योंकि आने वाले समय में हमें सरकार बनानी है: अखिलेश यादव, SP pic.twitter.com/UzGn9KZZzT — ANI_HindiNews (@AHindinews) February 3, 2022
अंधविश्वास है कि जो CM नोएडा जाता है, वो चुनाव हार जाता है, लेकिन एक मान्यता ये भी है कि जो नोएडा जाता है उसकी भी सरकार बनती है। मैंने 2011 में नोएडा से साइकिल यात्रा शुरू की और सरकार बनाई। मैं फिर से वहां जा रहा हूं क्योंकि आने वाले समय में हमें सरकार बनानी है: अखिलेश यादव, SP pic.twitter.com/UzGn9KZZzT
— ANI_HindiNews (@AHindinews) February 3, 2022
पण यातले तथ्य आणि वस्तुस्थिती तपासले असता एक वेगळेच सत्य सामोर येते. ते म्हणजे अखिलेश यादव हे 2013 नंतर नोएडा मध्ये आलेच नव्हते. 2013 मध्ये नोएडा मध्ये आशियाई विकास भाग शिखर संमेलन भरले होते. त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या परिषदेचे उद्घाटन केले होते. प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री या नात्याने अखिलेश यादव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते.
परंतु ते प्रत्यक्ष नोएडा मध्ये येऊन उपस्थित राहिले नाहीत, तर लखनौमधून त्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली होती. इतकेच काय पण नोएडा एक्सप्रेस वे चे उद्घाटन देखील अखिलेश यादव यांनी लखनऊ मधून ऑनलाईन पद्धतीनेच केले होते.
मध्यंतरीच्या काळात दादरी मध्ये अखलाख या तरुणाच्या हत्येचा विषय गाजला होता. त्याच्या वडिलांना अखिलेश यादव भेटले पण दादरी मध्ये जाऊन नव्हे तर लखनऊमध्ये अखलाखच्या वडिलांची अखिलेश यांनी भेट घेतली होती. त्यामुळे आज जरी अखिलेश यादव यांनी आपण “नोएडा अंधश्रद्धा” तोडली असल्याचा दावा केला असला तरी आपल्या सत्ताकाळात आणि विरोधी पक्षनेता असण्याच्या काळात देखील अखिलेश यादव यांनी हा दौरा टाळल्याचे दिसून आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App