विरोधकांचे ऐक्य वाऱ्यावर तरीही भाजप उत्तर प्रदेशात सर्व 80 जागा गमावण्याचा अखिलेश यादवांचा अजब दावा

वृत्तसंस्था

लखनऊ : लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजप उत्तर प्रदेशातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 80 जागा हरेल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उत्तर प्रदेशातल्या दोन मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन परिस्थिती पाहावी म्हणजे त्यांना समजेल भाजप उत्तर प्रदेशात लोकसभेच्या किती जागा जिंकेल ते!! वास्तवात भाजप उत्तर प्रदेशात सगळ्या 80 जागा हरेल, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. Akhilesh Yadav claims BJP will loose all 80 loksabha seats in UP

लखनऊ मध्ये भाजपची कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांनी राज्यातल्या कोठडीत मृत्यू पावलेल्या नोकरी देण्याचा ठराव मंजूर करावा. प्रत्येकी 1 कोटी रुपये त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचाही त्यात समावेश करावा, अशी आव्हानात्मक भाषा अखिलेश यादव यांनी वापरली आहे. बलवंत सिंग नामक व्यक्तीचा कोठडीत मृत्यू झाला. त्या संदर्भात अखिलेश यादव यांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे. मात्र हाच विषय पुढे नेऊन उत्तर प्रदेशात भाजप 80 जागी पराभूत होईल असा अजब दावा करून अखिलेश यादव यांनी राजकीय वर्तुळात वेगळी खळबळ उडवली आहे.



भाजपचा अव्वल परफॉर्मन्स

2019 मध्ये भाजपने लोकसभेच्या 80 पैकी 62 जागा जिंकल्या आहेत आणि 2024 मध्ये हाच राजकीय परफॉर्मन्स रिपीट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर भाजपने तळापासून काम करायला आधीच सुरुवात केली आहे. बाकीचे पक्ष अजूनही परसेप्शन लेव्हलवर काम करत आहेत.

विरोधकांचे ऐक्य वाऱ्यावर, तरीही…

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातून निघून गेली आहे. पण या यात्रेत अखिलेश यादव अथवा मायावती सामील झाले नव्हते. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य देखील उत्तर प्रदेशात वाऱ्यावरच आहे. तरी देखील अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात भाजप सर्वच्या सर्व 80 जागा गमावेल, असा अजब दावा केला आहे.

Akhilesh Yadav claims BJP will loose all 80 loksabha seats in UP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात