गळ्यात उपरणे परशु हातात; ब्राह्मण मतांच्या अखिलेश प्रेमात!!

प्रतिनिधी

लखनऊ : “गळ्यात उपरणे, परशु हातात; ब्राह्मण मतांच्या अखिलेश प्रेमात!!” अशी आज उत्तर प्रदेशात अवस्था झाली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या विजयासाठी प समाजातील सर्व घटकांशी जुळवून घेताना ब्राह्मण समाजाची मते समाजवादी पक्षाला मिळावी या हेतूने परशुरामांच्या मूर्तींचे उद्घाटन करण्याचा सपाटा लावला आहे. Akhilesh in love with the Brahmins vote

लखनऊमध्ये एक्सप्रेस वे नजीक उभारलेल्या परशुरामाच्या मंदिराचे अखिलेश यादव यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अखिलेश यादव यांनी जोरदार रोड शो केला. गळ्यात राधेचे उपरणे आणि हातात परशू असा त्यांचा अविर्भाव होता. उत्तरप्रदेशात ब्राह्मण समाज 12 टक्क्यांच्या आसपास आहे. ही मते ज्या पक्षाकडे वळतील त्या पक्षाला राज्यामध्ये मोठा राजकीय लाभ होतो, असे आत्तापर्यंतचे गणित आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी 2007 मध्ये पहिल्यांदा ब्राह्मण महासंमेलनांचा जो प्रयोग केला होता, त्याचा लाभ त्यांना मिळवून त्या बहुमताने सत्तेवर आल्या होत्या. 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने देखील तोच प्रयोग पुन्हा एकदा सुरू ठेवला आहे. बहुजन समाज पक्षाची ब्राह्मण महासंमेलने गाजली आहेत.

अखिलेश यादव हे देखील आता ब्राह्मण मतांसाठी ब्राह्मण समाजातील प्रभावी नेत्यांचा समाजवादी पक्षांमध्ये समावेश करून घेत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परशुरामाची मूर्ती उभारण्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्यापैकी लखनऊमध्ये एक्सप्रेस वे नजीक परशुराम मंदिराची उभारणी समाजवादी पक्षाने केली आहे. त्याचे उद्घाटन अखिलेश यादव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मोठा रोड शो करत हातात चांदीचा परशु घेत ब्राह्मण मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण समाजासाठी विशेष योजनादेखील समाजवादी पक्ष राबवेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर परशुराम मंदिर उद्घाटनाचे आणि रोड शो चे फोटो अखिलेश यादव यांनी शेअर केले आहेत.

Akhilesh in love with the Brahmins vote

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात