विवेक राम चौधरी :
देशाचे आगामी हवाईदल प्रमुख म्हणून एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची निवड केल्याची घोषणा आज केंद्र सरकारने केली आहे. हवाई दलाचे 45 वे उपप्रमुख म्हणून सध्या चौधरी कार्यरत आहेत.
परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, वायू सेना मेडल इ. सन्मानाने सन्मानित झालेले भारतीय वायु सेनेचे नवे हवाईदल प्रमुख विवेक राम चौधरी हे मूळचे नागपूरचे आहेत.
नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज मधूनही त्यांनी त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. हैदराबादमधील रामचंद्रपुरम मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते.
एअर मार्शल चौधरी हे उपप्रमुख होण्याआधी भारतीय हवाईदलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे कमांडर इन चीफ होते. संवेदनशील लडाख प्रदेश तसेच उत्तर भारताच्या भागामध्ये हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याची या कमांडवर जबाबदारी आहे.
२९ डिसेंबर १९८२ रोजी हवाईदलाच्या लढाऊ विभागात चौधरी यांचा समावेश झाला. चौधरी यांच्या ३ वर्षाच्या विशेष कारकीर्दीत त्यांनी हवाई दलाची प्रशिक्षक विमाने, तसेच लढाऊ विमाने उडवली आहेत. मिग-२१, मिग-२३ एमएफ, मिग -२९, सुखोई-३० एमकेआय विमानांच्या ऑपरेशनल फ्लाईंगसह ३८०० हुन अधिक तासांच्या उड्डाणाचा त्यांच्याकडे अनुभव आहे.
अनेक महत्त्वाची पदे एअर मार्शल चौधरी यांनी यापूर्वी भूषविली आहेत. फ्रन्टलाइन फायटर बेसचे कमांडिंग ऑफिसर तसेच फ्रन्टलाइन फायटर स्क्वाड्रनचे कमांडींग ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले आहे. ते उत्तम इन्स्ट्रुमेंट रेटिंग प्रशिक्षक, उड्डाण प्रशिक्षक, परीक्षक आहेत. ऑक्टोबर २०१९ ते जुलै २०२० पर्यंत ईस्टर्न एअर कमांड मध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच चौधरी हे सहाय्यक वायुसेना प्रमुख (कार्मिक अधिकारी) आणि नवी दिल्ली येथील हवाई दल भवनामधील हवाईदल मुख्यालयात हवाईदल उपप्रमुख म्हणून कामकाज पाहत होते.
लष्कर अभ्यासक्रमात गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र…मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युद्ध जिंकल्याचे सांगत कॉंग्रेसने दिला धार्मिक रंग
मनोज मुकुंद नरवणे :
भारतीय सैन्य दलाचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे देखील महाराष्ट्रातिल आहेत. त्यांचे वडील मुकुंद नरवणे भारतीय हवाई दलातील एक माजी अधिकारी आहेत. ते विंग कमांडर म्हणून सैन्यदलात काम करायचे. त्यांची आई ऑल इंडिया रेडिओवर आरजे म्हणून काम करायची. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी येथे झाले आहे.
नरवणे यांचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे आणि भारतीय सैन्य अकादमी देहरादून येथे झाले आहे. त्यांनी मद्रास चेन्नई विद्यापीठातून डिफेन्स एज्युकेशनमध्ये आपली पदवी संपादन केली आहे. डिफेन्स अँड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमफिल त्यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर मधून पूर्ण केले आहे तर डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज मध्ये पीएचडी त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केली आहे.
परम विशिष्ट सेवा, मेडल अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल इत्यादी सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते सैन्यदलाचे अठ्ठावीसवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम करतात.
Air Marshal VR Chaudhari and chief of army staff hails from maharashtra state, proud thing for each and every maharashtrian
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App