प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलात अग्निवीरांची भरती होत आहे. त्यासाठी अधिसूचना भारतीय हवाई दलाने जारी केली आहे. जानेवारी 2023 च्या बॅचसाठी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. Air force recruitment under Agneepath scheme
कोण करु शकतात अर्ज?
17.5 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेतून हवाई दलात भरती होण्यास पात्र असणार आहेत. 7 नोव्हेंबर 2022 पासून इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 23 नोव्हेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख आहे. अग्निवीरांसाठी ऑनलाईन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या काळात घेण्यात येणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत हवाई दलात भरती होणा-या अग्निवीरांना 4 वर्षे हवाई दलात नोकरीची संधी मिळणार आहे.
काय आहेत पात्रता?
हवाई दलात भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बारावीमध्ये गणित,भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांत किमान 50 % गुण असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्ष डिप्लोमा केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
कुठे कराल अर्ज?
अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलातील भरतीसाठी agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी या वेबसाईटवर उमेदवारांना आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लॉगिन करुन उमेदवारांना अर्ज भरता येईल आणि अर्जाची 250 रुपये रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App