AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या, स्वत:वर झाडली गोळी

प्रतिनिधी

हैदराबाद : हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या मुलीच्या सासऱ्याने आत्महत्या केली आहे. ओवैसी यांचे व्याही मजरुद्दीन अली खान हे व्यवसायाने डॉक्टर होते.AIMIM chief Asaduddin Owaisi committed suicide by shooting himself

या घटनेनंतर लगेचच त्यांना अपोलो रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सोमवारी दुपारी 2 वाजता मजरुद्दीन यांना रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले, असे रुग्णालयाने सांगितले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.



मजरुद्दीन खान हे AIMIM प्रमुख ओवैसी यांच्या दुसऱ्या मुलीचे सासरे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते ऑर्थोपेडिक तज्ज्ञ होते. 27 फेब्रुवारी रोजी त्यांनी परवानाधारक शस्त्राने स्वतःवर गोळी झाडली. यामागे कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांचा मृतदेह उस्मानिया जनरल हॉस्पिटलच्या शवागारात हलवण्यात आला आहे.

कौटुंबिक कलहामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

मृत्यूची माहिती देताना हैदराबाद पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मजहर यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. कुटुंबीयांनी त्यांना अपोलो रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मजहर (६०) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

ते म्हणाले की, घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि गोळीबाराचा एकच राऊंड झाल्याचे समोर आले. मालमत्तेवरून कुटुंबीय आणि मृत व्यक्ती यांच्यात वाद सुरू होता. त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी शस्त्र ताब्यात घेतले आहे. यासोबतच घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी मजरुद्दीन घरी एकटेच होते. काही नातेवाईक त्यांना सतत फोन करत होते, मात्र ते फोनला उत्तर देत नव्हते. यानंतर काही नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले, तेथे ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. डॉ. मजहरुद्दीन यांच्या मुलाने 2020 मध्ये ओवैसी यांच्या मुलीशी लग्न केले होते.

असदुद्दीन ओवेसी हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि 2004 पासून ते हैदराबादमधून खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच ओवेसी यांच्या सरकारी बंगल्यावर अज्ञातांनी दगडफेक केली होती. पोलिसांनी त्या घटनेची ही नोंद घेतली होती.

AIMIM chief Asaduddin Owaisi committed suicide by shooting himself

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात