विशेष प्रतिनिधी
मुबंई : क्रूझ ड्रग प्रकरणानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे या दोघांनी एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना एनसीबीचे वसुली अधिकारी बोलवत त्यांच्याविरूध्दचे पुरावे सोशल मिडीयावर शेअर केले हाेते.समीर वानखेडे दुबईला आणि मालदीवला जाऊन बॉलीवूड अभिनेत्यांकडून पैसे वसुली केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे मुसलमान असून त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे आहे असा देखील दावा मलिक यांनी केला होता. या सर्व प्रकरणामध्ये आता वैयक्तिकरीत्या एकमेकांवर आरोप केले जात आहेत. अशा वेळी समीर वानखेडे यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
After the allegations of Nawab Malik, the reaction of Sameer Wankhede’s father came to the fore
‘माझं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे दाऊद नाही. हे कोणीतरी केले असेल किंवा लिहिले असेल, याच्याबद्दल माहिती नाही. पण माझे खरे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडेच आहे.’ असे त्यांनी ठासून सांगितले आहे. ‘माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, पत्नीने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे प्रमाणपत्र आहे. असे असल्या नंतर प्रश्न कुठून उद्भवतात हे मला समजत नाही.’ असे समीर वानखेडेंच्या वडिलांनी झी चोवीस तास बोलताना सांगितले आहे.
SAMEER WANKHEDE:मलिकांनी व्हायरल केलेला तो जन्माचा दाखला खोटा ; कोर्टात चॅलेंज करणार; समीर वानखेडेंचे नवाब मलिक यांना प्रत्युत्तर
माझ्या मुलाचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असून नवाब मलिक यांनी दिलावे सर्व पुरावे खोटे आहेत. त्याचप्रमाणे सरकार त्यांचे असल्यामुळे ते काहीही करु शकतात. असे देखील समीर वानखेडे यांचे वडील यावेळी म्हणाले आहेत. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगताना ते म्हणाले, नियमाप्रमाणे घटस्फोट झाला असून यांच्यामध्ये चुकीचे काहीही नाही.
पुढे ते म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर समीरला राजीनामा द्यायला सांगू. तो वकिल आहे. देशाची सेवा करण्याची जिद्द आहे. म्हणून तो हे काम करत आहे. त्याच्यावर हल्ला झाला तरी हे सरकार काही करत नाही. अशी खंत त्यांनी यावेळी वक्तव्य केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App