ज्ञानवापी नंतर आता मथुरेतही श्रीकृष्ण जन्मभूमीचा सर्व्हे, 20 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था

मथुरा : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोडविला. तेथे आता भव्य राम मंदिर उभे राहत आहे. त्यानंतर काशीतील ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. कोर्टाचा निकाल तेथे केव्हाही लागण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह वादाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात झालेल्या सर्व्हेसारखा सर्व्हे मथुरेतही करण्याचे आदेश दिले आहेत. After Gyanavapi, now in Mathura also survey of Shri Krishna Janmabhoomi

हिंदू सेनेच्या याचिकेवर सुनावणी करताना मदुरेतील वादग्रस्त स्थळाचा सर्व्हे करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. सर्व पक्षकारांना नोटीस बजावून कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचेही निर्देश दिले.
आता हा सर्व्हे अहवाल 20 जानेवारी रोजी कोर्टात सादर केला जाईल. या प्रकरणी हिंदू पक्ष प्रदीर्घ काळापासून सर्वेक्षण करण्याची मागणी करत होता. कोर्टाच्या आदेशानुसार, शाही ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त परिसरात वैज्ञानिक सर्व्हे केला जाईल. यावर निगराणी करण्यासाठी कोर्ट आयुक्त नियुक्त करण्यासाठी जिल्हा न्यायालयात वर्षभरापूर्वी एक याचिका दाखल करण्यात आली होती.

शाही ईदगाहमध्ये आहेत पुरावे

हिंदू पक्षाने शाही ईदगाहमध्ये स्वस्तिकचे चिन्ह आणि मशिदीच्या खाली देवाचे गर्भगृह असल्याचा दावा केला आहे. पक्षकार मनीष यादव आणि वकील महेंद्र प्रताप सिंह यांनीही शाही ईदगाहमध्ये हिंदू स्थापत्य कलेचे पुरावे अस्तित्वात असून, ते वैज्ञानिक सर्व्हेनंतर उजेडात येतील असा दावा केला आहे.

औरंगजेबाने मंदिर पाडून बांधली ईदगाह

8 डिसेंबर रोजी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता आणि उपाध्यक्ष सुरजीत सिंह यादव यांनी सिव्हिल न्यायाधीश सीनियर डिव्हिजन (तृतीय) सोनिका वर्मा यांच्या न्यायालयात हा दावा सादर केला आहे.

औरंगजेबाने श्रीकृष्ण जन्मभूमीच्या 13.37 एकर भूखंडावरील मंदिर पाडून ईदगाह बांधली होती. यासंबंधी त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून मंदिर बांधेपर्यंतच्या इतिहासाचे सर्वच पुरावे न्यायालयात दाखल केलेत. याचिकाकर्त्याने 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ विरुद्ध शाही ईदगाहमध्ये झालेला करारही अवैध घोषित करून रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, फिर्यादीची याचिका सुनावणीसाठी मान्य करत अमीन यांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वादाची पार्श्वभूमी

शाही ईदगाह मशिद मथुरा शहरातील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर परिसराला अगदी चिकटून आहे. हे ठिकाणी हिंदू धर्मानुसार भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मानले जाते. यासंबंधीच्या माहितीनुसार, औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थळावर बांधण्यात आलेले प्राचीन केशवनाथ मंदिर पाडून 1669 – 70 मध्ये त्या ठिकाणी शाही ईदगाह मशिद बांधली.

1935 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने 13.37 एकरांचा वादग्रस्त भूखंड वाराणसीच्या राजा कृष्णदास यांना अलॉट केला होता. 1951 मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टने हा भूखंड संपादित केला होता. हा ट्रस्ट 1958 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा संघ व 1977 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थेच्या नावाने नोंदणीकृत झाला.

1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही ईदगाह कमिटीमध्ये झालेल्या करारानुसार या 13.37 एकर जमिनीची मालकी ट्रस्टला मिळाली. त्यानंतर ईदगाह मशिदीचे व्यवस्थापन ईदगाह कमिटीला सुपूर्द करण्यात आले.

After Gyanavapi, now in Mathura also survey of Shri Krishna Janmabhoomi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात