विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – तालिबानला पाकिस्तानची फूस असल्याचा आरोप करताना अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉप स्टार आर्याना सयीद हिने भारत हा सच्चा मित्र असल्याची भावना व्यक्त केली आहे. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काबूलमधून निसटण्यात आर्याना यशस्वी ठरली.Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet
तिने एका अज्ञात ठिकाणावरून ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पाकला धारेवर धरताना ती म्हणाली की, तालिबानी दहशतवाद्यांना पाककडून सूचना आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे तळ पाकिस्तानात आहेत.
आर्यानाने जगाला आवाहनही केले. ती म्हणाली की, आंतरराष्ट्रीय समुदाय सर्वप्रथम पाकचा निधी रोखेल अशी मला आशा आहे. तालिबानला पैसा पुरविण्यासाठी पाकला निधी देऊ करू नये. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र बसून अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तोडगा शोधावा.
त्यांनी पाकवर दबाव आणावा. अफगाणिस्तानमधील या सर्व समस्यांचा त्यांना पाकमुळेच सामना करावा लागत असल्याचे माझे ठाम मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App