‘मुले देवाघरची फुले’ अशी म्हणच आहे मराठीत. याच म्हणीचा दाखला जम्मू आणि काश्मिरातल्या एका सहा वर्षीय मुलीने जगाला दिला. होय, काश्मिरी सफरचंदासारख्या गोड मुलीचा अवघ्या एक मिनिट 11 सेकंदांचा एक व्हिडीओ प्रचंड वेगाने जगभर व्हायरल झाला आहे. लक्षावधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर हजारो लाईक्स-कॉमेंट्सचा पाऊस पडतो आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओतून ही काश्मिरी कन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी गळ घालते आहे, त्याची दखल जम्मू आणि काश्मिरच्या राज्यपालांनी तात्काळ घेतली आहे. काय आहे हे भलतेच ‘गोड’ प्रकरण? ‘Adorable Complaint’ to PM Modi, stroms social media and J&K L-G replies in no time. “Assalamualaikum Modi sahib,” says the sweet Kashmiri girl, at the beginning of the video and complains later on.
वृत्तसंस्था
श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान तर आहेतच. शिवाय लहान मुलांमध्येही त्यांची प्रतिमा ठसलेली आहे. ती किती याचा उलगडा करणारा एक व्हिडीओ गेल्या काही तासांमध्ये सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
या व्हिडीओमध्ये काश्मिर खोऱ्यातली एक सहा वर्षांची मुलगी तिच्या ऑनलाईन क्लासबद्दलची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करते आहे. खरे तर हा विषय जम्मू आणि काश्मिर प्रशासनाच्या अखत्यारीतला. पण त्या सहा वर्षांच्या मुलीलाही वाटलं की,
थेट मोदींकडे तक्रार केली तरच माझा हट्ट पूर्ण होईल.या सहा वर्षांच्या मुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मेसेजने सोशल मीडियाची मने जिंकली आहेत. शिवाय लहान मुलांनाही नरेंद्र मोदींबद्दल केवढा आत्मविश्वास वाटतो हे यातून स्पष्ट झाले आहे.
जेमतेम 1 मिनिट अकरा सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ही मुलगी हिंदीतून म्हणते – “अस्सलाम आलेकुम मोदी साहेब. मी एक सहा वर्षांची मुलगी बोलते आहे. झूम क्लासमधून सहा वर्षांच्या छोट्या मुलांना त्यांच्या मॅडम, टीचर आणि सर एवढं जास्त काम का देतात?
एवढं काम तर मोठ्या मुलांसाठी असतं. मी सकाळी उठते. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत झूम क्लास असतो. आधी इंग्रजी, मग मॅथ्स्, उर्दू, इव्हीएस, कॉम्प्युटर…इतकं जास्त काम तर मोठ्या मुलांसाठी असतं.”
ही गोड तक्रार केल्यानंतर ही मुलगी पंतप्रधानांना उद्देशून प्रश्न करते, “छोट्या मुलांना एवढं काम का मोदीसाहेब?” यानंतर ही छोटीशी कन्या खांदे उडवत थेट मोदींनाच निरागसपणे विचारते, “आप क्या कर रहे है?” या संदेशानंतर गुड बाय म्हणत ती मोदींचा निरोप घेते.
शाळेतल्या शिक्षकांकडून मुलांवर गृहपाठाचं ओझं टाकलं जात आहे आणि यात थेट पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला पाहिजे, अशी या कन्येची अपेक्षा आहे. तीची ती गोड तक्रार जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यापर्यंत पोहोचली.
त्यांनी तातडीने याची दखल घेतली. सहा वर्षीय कन्येचा व्हिडिओ ट्वीट करत त्यावर सिन्हा यांनी म्हटले आहे की – “खूपच गोड तक्रार. शाळकरी मुलांच्या खांद्यावरील गृहपाठाचं ओझं कमी करणारे धोरण
येत्या 48 तासात तयार करण्याचे आदेश मी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. बालवयातली निरागसता ही दैवी देणगी आहे. त्यांचं बालपण हे जिवंत, आनंदानं भरलेलं आणि चैत्यनदायी असलं पाहिजे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App