कौतुकास्पद : सिंघम फेम अभिनेते प्रकाश राज यांनी अनाथ मुलीला लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यास दिली आर्थिक मदत

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : सिंघममधील भूमिकेमुळे अभिनेते प्रकाश राज यांचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. साऊथ मध्ये त्यांनी अनेक सिनेमात कामे केलेली आहेतच. पण त्यांचा बॉलिवूड मधील प्रवास सुरु झाला तो सिंघम मधील त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे. तर नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा साठी प्रसिद्ध असणारे प्रकाश राज सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत.

Admirable: Singham fame actor Prakash Raj gives financial help to an orphan girl to complete her education in London

त्यांनी एका अनाथ मुलीला लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. तसेच लंडनमध्ये नोकरी शोधण्यासाठीही त्यांनी तिला आर्थिक मदत दिली आहे. याची बातमी नवीन मोहामेडाली यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.


सत्तेसाठी आत्तापासूनच गुंडा-पुंडांचे समर्थन, समाजवादी पक्षाच्या वतीने राजभर यांचा मुख्तार अन्सारीला पाठिंबा


नवीन यांनी याबाबत प्रकाश राज यांचे आभार मानले आहेत. तर प्रकाश राज यांनी ह्या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे की, आपण एकमेकांना मदत करून, एकमेकांत पुढे नेले पाहिजे.

साउथ इंडस्ट्रीमध्ये प्रकाश राज यांना प्रचंड मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. तसाच चाहतावर्ग बॉलीवूडमध्येदेखील निर्माण झाला आहे. वॉण्टेड, सिंघम यामधील त्यांनी केलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. तर आत्ता त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Admirable: Singham fame actor Prakash Raj gives financial help to an orphan girl to complete her education in London

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात