विशेष प्रतिनिधी
मुंबई : आदित्य म्हणे, एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले. संजय राऊत, सुषमा अंधारे आदित्यच्या समर्थनासाठी उतरले, पण शिंदे रडलेले या नेत्यांना 9 महिन्यानंतर आठवले?? त्याआधी आठवलेच नाही??, हा खरा प्रश्न आहे!! कारण ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आले त्याला 9 महिने उलटून गेले आहेत.aditya Thackeray’s claim of eknath shinde weeping, why that incident remembered after 9 months??
दरम्यानच्या काळात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोपांच्या तुफान फैरी झाडल्या आहेत. पण या आरोपांच्या फेरीमध्ये ठाकरे गटाकडून गेल्या 9 महिन्यांमध्ये एकदाही एकनाथ शिंदे मातोश्रीवर जाऊन रडल्याचा उल्लेख कोणी केला नव्हता, तो उल्लेख आदित्य ठाकरे यांच्या कालच्या एका मुलाखतीत पुसटसा आला होता. एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. ते मातोश्रीवर येऊन रडले आणि भाजप बरोबर चला असे म्हणाले होते अशी खंडी आठवण आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या फरड्या इंग्लिश मध्ये त्या मुलाखतीत सांगितली. काल रात्री मराठी माध्यमांनी उशिरा ही बातमी चालवली. त्यामुळे आदित्य यांच्या समर्थनासाठी आज सकाळी सुषमा अंधारे आणि संजय राऊत उतरले. या दोन्ही नेत्यांनी आदित्य ठाकरे जे बोलले ते बरोबरच बोलले. भाजपची तशीच मोडस ऑपरेंडी आहे. ईडी – सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावायच्या आणि विरोधकांना धमक्या देऊन वश करून घ्यायचे हेच भाजप सरकारचे काम आहे, असे आरोप या दोन्ही नेत्यांनी लावले.
त्या पुढे जाऊन संजय राऊतांनी एकनाथ शिंदे राऊतांच्या दिल्लीच्या बंगल्यातही आपल्याला जेलमध्ये जाण्याची भीती वाटते असे म्हणाले होते, असा दावा केला. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, की आदित्य ठाकरे जे बोलले ते 100 % टक्के सत्य आहे. एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. आम्ही त्यांना विचारले पण तुम्हाला जेलमध्ये का टाकतील?? तुम्हाला पक्षाने एवढे सगळे दिले आहे तुम्हीच ठामपणे पक्षाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. पण ते घाबरले होते. एकनाथ शिंदे आज ज्यांचे नेतृत्व करत आहेत, त्या अनेकांवर ईडी – सीबीआयची कारवाई चालू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही तशाच धमक्या आल्या होत्या, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
#WATCH आदित्य ठाकरे जो कह रहे हैं वह पूरी तरह से सच है, मेरे घर पर आकर अभी जो मुख्यमंत्री(एकनाथ शिंदे) है उन्होंने भी यही कहा था कि मैं जेल नहीं जाना चाहता, आप यह गठबंधन तोड़िए। पार्टी ने अगर आपको सब कुछ दिया है तो पार्टी के साथ खड़े रहना चाहिए। पूरे देश में एक दबाव का तंत्र चल… pic.twitter.com/FqtZn8RPo1 — ANI_HindiNews (@AHindinews) April 13, 2023
#WATCH आदित्य ठाकरे जो कह रहे हैं वह पूरी तरह से सच है, मेरे घर पर आकर अभी जो मुख्यमंत्री(एकनाथ शिंदे) है उन्होंने भी यही कहा था कि मैं जेल नहीं जाना चाहता, आप यह गठबंधन तोड़िए। पार्टी ने अगर आपको सब कुछ दिया है तो पार्टी के साथ खड़े रहना चाहिए। पूरे देश में एक दबाव का तंत्र चल… pic.twitter.com/FqtZn8RPo1
— ANI_HindiNews (@AHindinews) April 13, 2023
पण मूळात वर उल्लेख केल्याप्रमाणे आदित्य ठाकरे असोत, सुषमा अंधारे असोत, अथवा संजय राऊत, या तिन्ही नेत्यांना एकनाथ शिंदे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने रडले होते हे तब्बल 9 महिन्यानंतर आठवले?? त्याआधी आठवलेच नाही?? हा खरा प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे खरच ओरडले होते तर ठाकरे पवार सरकार गेल्याबरोबरच्या पत्रकार परिषदांमध्ये ठाकरे गटाच्या एकाही नेत्याने तसा उल्लेख का केला नाही?? एकनाथ शिंदे खरंच रडले असतील तर तो प्रसंग कोणी का सांगितला नाही?? की त्याचे तेव्हा राजकीय भांडवल करता येणे शक्य नव्हते असे ठाकरे गटाला वाटले??, हे प्रश्न मोलाचे आहेत. की शिंदे रडण्याचा दावा करून ठाकरे गटाला आता काही वेगळेच साध्य करायचे आहे?? हा ही प्रश्न आहे. याची उत्तरे सहज सोपी नाहीत त्यावर काही आदमासच लावावा लागेल. तो असा गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या गिनतच नाहीत. त्यांनी केलेल्या कुठल्याच वक्तव्यावर ते लहान आहेत वगैरे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत. आदित्य यांना हा त्यांचा “पॉलिटिकल इनसिग्निफिकन्स” डाचतो आहे आणि त्यामुळेच अस्वस्थ होऊन आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांना ते रडले असे सांगून टार्गेट तर करत असावेत आणि त्यांना नेहमीप्रमाणे अंधारे – राऊतांची साथ मिळत आहे.
पण तरी मूळ प्रश्न त्याहीपेक्षा खरा आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे रडले होते हे आदित्य सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांना 9 महिन्यांनंतर कसे आठवले??, हा आहे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची आता आदित्य ठाकरे आणि ठाकरे कॅम्पला खरंच भीती वाटू लागली आहे का??, त्यामुळे ते घाबरट आहेत. ते घाबरून भाजपकडे निघून गेले, हे ठाकरे गटाला एस्टॅब्लिश करायचे आहे का??, हाही प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App