अदानी मुद्यावर राहुल गांधींची कन्सिस्टन्सी नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समन सारखी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे आणि शरद पवार यांच्यासारखे यूपीएतील सर्वांत ज्येष्ठ नेते जंग-जंग पछाडत आहेत, पण राहुल गांधी अदानी मुद्दा सोडायला तयार नाहीत. अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये आले कुठून हा प्रश्न ते सतत विचारतच आहेत. भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे प्रवक्ते पातळीवरचे नेते सोडले तर बाकी कोणतेही वरिष्ठ नेते राहुल गांधींच्या अदानी मुद्द्याला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडत नाहीत, तर शरद पवारांनी 7 मार्चपासून अदानी मुद्द्यावर मुलाखती आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. Adani issue : rahul Gandhi’s consistency as non striker and batsman

पण तरीही राहुल गांधी आणि काँग्रेस गप्प बसलेले नाहीत. उलट शरद पवारांना महाराष्ट्रातलेच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी स्पष्ट खुलासा करून पवारांची वैयक्तिक भूमिका फेटाळून लावली आहे आणि त्यापलिकडे जाऊन राहुल गांधींनी एक शब्दकोडे ट्विट करून अदानी मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारला टार्गेट केले आहे.

नॉन स्ट्रायकर एंड बॅट्समन

अर्थात हे जरी कितीही खरे असले, तरी अदानी मुद्द्यावर राहुल गांधींनी स्वीकारलेली राजकीय कन्सिस्टन्सी ही क्रिकेटमधल्या नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समन सारखी आहे. नॉन स्ट्राइकर एंडचा बॅट्समन प्रत्यक्ष मैदानावर तर असतो. अगदीच अनपेक्षित घटना घडली नाही तर तो आऊटही होत नाही, पण त्याचबरोबर कोणताही बॉल खेळण्याची त्या बॅट्समनला संधी मिळत नाही. फक्त रन काढण्यापुरता त्याचा उपयोग असतो. अनेकदा कसलेला बॅट्समन कमकुवत बॅट्समनला आपल्या कौशल्याने खेळ करून कायम नॉन स्ट्रायकर एंडला ठेवत असतो, की जेणेकरून आपल्या बाजूचा डाव संपू नये आणि सामना वाचविण्याची अथवा सामना जिंकण्याची संधी गमावली जाऊ नये. विशेषतः सामना निर्णायक अवस्थेत आला असताना कोणत्याही क्रिकेट संघाची हीच अवस्था असते. आज काँग्रेसची अवस्था तशीच आहे.

भाजप वरिष्ठ नेतृत्वाला फरकच पडत नाही

2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आली असताना राहुल गांधींनी आणि त्यांच्यावर टीमने अदानी मुद्दा शोधून काढला आहे. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानावर खेळताना राहुल गांधी हे नॉन स्ट्रायकर एन्डलाच उभे असल्यामुळे ते आऊट होत नाहीत, हे खरे. पण ते खेळूही शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अदानी मुद्द्यावर थोडे का होईना पण हलले असते किंवा त्यांना काहीतरी राजकीय कृती करणे भाग पडले असते. या दोन्हीपैकी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये काहीही घडताना दिसत नाही. राहुल गांधींनी अदानी मुद्द्यावर कितीही तोफा डागल्या, संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन पूर्ण वाया घालवले, तरी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातल्या नेतृत्वाला किंचितसा धक्काही लागलेला नाही. या अर्थाने राहुल गांधींची अदानी मुद्द्यावरची राजकीय भूमिका सातत्यपूर्ण म्हणजेच पॉलिटिकल कन्सिस्टन्सीची असली तरी, ती एखाद्या नॉन स्ट्रायकर एंडवरच्या बॅट्समन सारखी झाली आहे. ते अदानी मुद्दा सोडूनही देत नाहीत आणि भाजप त्यांना भाजपचे वरिष्ठ नेतृत्व त्यांना प्रत्युत्तरही देत नाही!!

मुद्दा राहुल गांधींनी उचलला म्हणून…

2024 ची लोकसभा निवडणूक अदानी मुद्द्यावर व्हावी अशी कदाचित राहुल गांधींची फार मोठी इच्छा असू शकेल पण 2024 चे निकाल अदानी मुद्द्यावर अवलंबून न ठेवणे हे भाजप नेतृत्वाचे कौशल्य असेल. पण ते अद्याप पणाला लागायचे आहे. त्यातही तो मुद्दा राहुल गांधींनी उचलला असल्यामुळे तसेही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आपले राजकीय कौशल्य खरंच कितपत पणाला लावावे लागेल हा प्रश्नच आहे!!, पण त्या प्रश्नाचे उत्तर इतक्यात शोधायचे कारण नाही. कारण राहुल गांधी अजून नॉन स्ट्रायकर एंडवरच टिकून आहेत!!

Adani issue : rahul Gandhi’s consistency as non striker and batsman

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात