विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लिल चित्रपट निर्मितीप्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. अश्लिल चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पदार्फाश केला होता. याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्यावर सात ते आठ तास चौकशी केल्यावर पोलिसांनी कुंद्राला अटक केली.Actress Shilpa Shetty’s husband arrested for making obscene film
पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले होते. याप्रकरणात पोलिसांनी गंदी बातमधील अभिनेत्री गहना वशिष्ठला वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली होती.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या.
मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाºया अनेकांची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App