विशेष प्रतिनिधी
मुबंई : 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग पार्टीमध्ये एनसीबीकडून रेड टाकण्यात आली होती. त्यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळून आले नव्हते. फक्त व्हॉट्सअॅप चाटच्या आधारे एनसीबीने त्याला अटक केली होती. बऱ्याच दिवसांपासून त्याची बेल देखील नामंजूर करण्यात आली होती. पण आता हायकोर्टाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला आहे.
Actor Sonu Sudane’s tweet after Aryan Khan’s bell was approved goes viral
आर्यन खानच्या अटकेनंतर चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी ट्वीटद्वारे आणि सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट शेअर करून शाहरुख खानला आपला सपोर्ट दाखविला होता. तर आता अभिनेता सोनू सूद याचे एक ट्विट व्हायरल होत आहे. सोनू सूदने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, “समय जब न्याय करता है, तो गवाहोंकी जरूरत नही होती”.
Sonu Sood : सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयावर आज दुसऱ्या दिवशीही प्राप्तिकर विभागाची कारवाई, काल 20 तास सुरू होता तपास
आर्यन खानला जरी बेल मिळाली असेल तरी तो आज तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचे निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी अंतिम निर्णय होणार आहे. त्यानंतर ते तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App