विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सरकारी सन्मान तर सुरू झालाच आहे, पण आता त्या पाठोपाठ सावरकरांना ऑन स्क्रीन देखील अच्छे दिन आले आहेत. रणदीप हुड्डा याचा स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा ऑन स्क्रीन तेजीत आलाच आहे. पण त्या पाठोपाठ आता नाटू नाटू फेम दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सावरकरांभोवतीचा एक सिनेमा निर्मित करत आहे. सावरकरांच्या जयंतीनिमित्त कालच रामचरण याने या सिनेमाची घोषणा करून त्याचा टिझरही रिलीज केला.Achhe din for Savarkar on screen; Randeep Hooda followed by Ram Charan’s thrilling movie “The India House”!
सावरकर आपल्या क्रांतिकारी आयुष्यात लंडनच्या ज्या इंडिया हाऊस मध्ये राहिले होते, त्या इंडिया हाऊस मधल्या सर्व क्रांतिकारी घटनांवर प्रकाश टाकणारा “द इंडिया हाऊस” हा सिनेमा आहे. प्रख्यात क्रांतिकारक शामजी कृष्ण वर्मा यांचे हे इंडिया हाऊस लंडन मधले निवासस्थान होते. त्यांनी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती रकमेवरच सावरकर बॅरिस्टरी शिकण्यासाठी लंडनला पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ लोकमान्य टिळक आणि काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांची शिफारस पत्रे होती. सावरकर वयाच्या 24 व्या वर्षी अभिनव भारताचे अर्थात देशभरातल्या क्रांतिकारक चळवळीचे नेते बनले. त्यांच्याभोवती उच्चविद्याविभूषित क्रांतिकारक तरुणांचा गोतावळा जमला. याच इंडिया हाऊस मध्ये सावरकरांनी 1857 च्या स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव, गुरुगोविंद सिंग यांची जयंती आदी कार्यक्रम साजरे केले होते. यापैकी एका कार्यक्रमाला महात्मा गांधी आणि सावरकर एका स्टेजवर आले होते. याच इंडिया हाऊस मध्ये रशियन क्रांतिकारकांचे क्रांतीचे प्रणेते निकोलाय लेनिन यांनी सावरकरांची भेट घेतल्याचे वृत्तांत आहेत.
All the best!! You're doing an incredible job 💪👏 — Aarohi Tripathy 🇮🇳 (@aarohi_vns) May 28, 2023
All the best!! You're doing an incredible job 💪👏
— Aarohi Tripathy 🇮🇳 (@aarohi_vns) May 28, 2023
सावरकर इंडिया हाऊस मध्ये 4 वर्षे राहिले. या सर्व 4 वर्षांच्या काळात त्यांच्या जागतिक क्रांतिकारकांच्या भेटीगाठी झाल्या. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन आणि कर्झन वायली यांच्या वधाचा कट याच इंडिया हाऊस मध्ये रचला गेला. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सर्व प्रयत्न याच इंडिया हाऊस मधून झाले. या सर्व घटनांवर “द इंडिया हाऊस” हा थरारपट झगझगीत प्रकाश टाकणार आहे.
काँग्रेसी इतिहासकारांनी दडवून ठेवलेले एक ऐतिहासिक पान जागतिक पातळीवर ऑन स्क्रीन उलगडणार आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्थ अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका असून राम वामसी कृष्ण हे दिग्दर्शक असणार आहेत. रणदीप हुड्डा याच्या “स्वातंत्र्यवीर सावरकर” या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाच आहे त्या पाठोपाठ आता “द इंडिया हाऊस” हा थरारपट सावरकरांच्या क्रांतिकारी जीवनाचा आरसा संपूर्ण जगासमोर आणणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App