प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरू असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या व्यक्तीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावाचा वापर करून सगळ्यांना गंडा घातला आहे.Accused who cheated MLAs by pretending to be Nadda’s PA by luring him as minister arrested
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रातील काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असे या आरोपीचे नाव आहे. त्याला गुजरातच्या मोरबीमधून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावाचा गैरवापर करत होता.
गेल्या काही दिवसांत आरोपीनं भाजपच्या काही आमदारांना फोन केले होते. आपण नड्डांच्या जवळचे आहोत, असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या आरोपीने ७ मे रोजी संपर्क साधला होता. मात्र कुंभारेंना त्याच्यावर संशय आला, आणि त्यांनी या प्रकाराची अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अशी कुठलीही व्यक्ती नड्डांच्या जवळची नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याप्रकरणी लेखी तक्रार दिली. पोलीस तपासनंतर राठोड याचे कारनामे समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App