रेवदंडा- रोहा मार्गावर बेफाम ट्रकने उडविल्याने चार ठार, चार जखमी, पुण्यातील स्वारगेटमधील सतीश माने घटनेच्या आठवणी


मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहे. आसपासच्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. साळाव ते चनेरा दरम्यान रस्त्यात येणारी अनेक वाहने या ट्रक ने चिरडून टाकली. त्यामुळे परिसरात सर्वत्र हाहाकार माजला होता. Four killed, four injured in road mishap in Revdanda-Roha road, memories of Satish Mane incident at Swargate in Pune


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहे. आसपासच्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. साळाव ते चनेरा दरम्यान रस्त्यात येणारी अनेक वाहने या ट्रक ने चिरडून टाकली. त्यामुळे परिसरात सर्वत्र हाहाकार माजला होता.

पुण्यामधील स्वारगेट येथे काही वर्षांपूर्वी संतोष माने नावाच्या चालकाने एसटी बस बेफामपणे चालवून अनेकांचा बळी घेतला होता. या घटनेच्य आठवणी यामुळे ताज्या झाल्या.रेवदंडा येथून हा ट्रक रोह्याच्या दिशेने वेगाने निघाला होता. साळाव आणि आमली येथे त्याने प्रत्येकी एका व्यक्तीला धडक देऊन जखमी केले. चेहेर येथे आणखीन दोघांना उडवले. या घटनेची माहिती मिळताच पुढील गावातील गावकऱ्यानी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र अडथळे उडवून ट्रक निघून गेला. ट्रक चालकाने न्हावे फाटा इथं एका दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यात दुचाकीवरून प्रवास करणारे शिक्षक लक्ष्मण ढेबे, त्यांची पत्नी रामेश्वरी ढेबे आणि मुलगा रोहित ढेबे हे तिघे ठार झाले. पुढे सारसोली इथं पादचा ऱ्याना दिलेल्या धडकेत उदय वाकडे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चौघांना ट्रकने धडक दिली. यात ते जखमी झाले. भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जमावाला शांत करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.

Four killed, four injured in road mishap in Revdanda-Roha road, memories of Satish Mane incident at Swargate in Pune

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था