वृत्तसंस्था
थिंपू : भूतानमध्ये 60 टक्के लोकसंख्येपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस पोचली आहे. आठवडाभरापूर्वी या देशात लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली होती. Accelerating corona preventive vaccination campaign in Bhutan; Dose to 60% of people
भारत आणि चीनदरम्यान, असणाऱ्या या राष्ट्रात 770,000 पैकी 470,000 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. भारताकडून कोविशील्ड लसीचा डोस देण्यात आला. एएफपीच्या सर्वेक्षणानुसार भूताननं इस्रायल, संयुक्त अरब अमीरात या देशांप्रमाणंच अतिशय वेगानं लसीकरण मोहिम पार पाडली आहे.
लसीकरण मोहिमेत गरोदर महिला, बाळाला नुकत्याच जन्म दिलेल्या माता, लहान मुलं आणि गंभीर आजार असणारे रुग्ण वगळता इतर सर्वांनाच लस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. सध्या 70 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसोबत विकलांग नागरिकांना लस देण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 896 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यामध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App