वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. या बाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. About 100% electrification of Konkan Railway Prime Minister Narendra Modi congratuleted the team
कोकणरेल्वे ‘मिशन १०० % विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशासाठी आणि शाश्वत विकासाचे नवीन मानदंड स्थापित करण्यासाठी टीमने केलेल्या कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय रेल्वे मिशन १०० % विद्युतीकरण अंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा मार्ग प्रदान करण्यासाठी संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याच्या मिशन मोडवर आहे. हरित वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि रेल्वे मंत्री अश्विनी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्याबद्दल राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी समाधान व्यक्त केले.
कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटरच्या विद्युतीकरणाच्या कामाची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली. प्रकल्पाची एकूण किंमत १२८७ कोटी आहे. रेल्वे मार्गाची CRS तपासणी मार्च २०२० पासून सहा टप्प्यांत यशस्वीपणे करण्यात आली. कोविड महामारीमुळे विद्युतीकरण प्रकल्प आव्हानात्मक झाला. शिवाय पावसाळ्यात विद्युतीकरण मोहीम अखंड ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App