राघव चढ्ढा : “नको सरकारी बंगला” ते “हवा मोठाच बंगला”; आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा राजकीय प्रवास!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत पारंपारिक सत्ताकांक्षी पक्षांना बाजूला सारून सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीची सुरुवात सरकारी गाडी, बंगला, सोयी सुविधा काही नकोत. आम्ही सामान्य माणसांसारखे राहू आणि सेवा करू अशी होती. पण आता त्याच आम आदमी पार्टीचे नेते इतर पक्षांपेक्षा जास्त सरकारी सोयी सुविधा आणि सरकारी मौजमस्ती यात मग्न झाल्याचे दिसत आहे.  AAP’s Raghav Chadha loses bungalow he got above his grade, takes RS Secretariat to court

अरविंद केजरीवाल यांचा हाय प्रोफाईल बंगला आणि त्यांची सजावट हा विषय माध्यमांमध्ये चर्चेला असतानाच आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या सरकारी बंगल्याचा मामला समोर आला आहे. राज्यसभा सचिवालयाने त्यांना त्यांच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचा बंगला खाली करायला सांगितला म्हणून राघव चढ्ढा संतापून कोर्टाची पायरी चढले आणि तिथून त्यांनी बंगला खाली करायला तात्पुरती स्थगिती मिळवली.

पण मूळात राघव चढ्ढा राज्यसभेचे प्रथमच खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना सरकारी नियमानुसार टाईप V हाच बंगला मिळाला पाहिजे. पण प्रत्यक्षात राज्यसभेच्या सभापतींनी त्यांना चुकून V|| हा बंगला एलॉट केला. राघव चढ्ढा आपल्या आई वडील यांच्यासह तिथे राहायला आले आणि राज्यसभा सचिवालयाने त्यांना काही दिवसांनी बंगला खाली करायची नोटीस पाठवली. त्यामुळे चिडलेल्या राघव चढ्ढा यांनी कोर्टाची पायरी चढली आणि तिथून बंगला खाली करायला स्थगिती मिळवली आणि त्यांनी भाजप सरकारवर आरोप केला. आपले तोंड बंद करण्यासाठी भाजपच्या सरकारने आपल्याला सरकारी बंगला खाली करायला लावण्याची नोटीस पाठवली पण आपण कोर्टातून स्थगिती मिळवली, असे राघव चढ्ढा म्हणाले.

पण वस्तुस्थिती अशी आहे की मूळात राघव चढ्ढा यांना सरकारी नियमानुसार ते पहिल्यांदाच खासदार झाल्यामुळे टाईप V बंगला मिळायला पाहिजे. कारण टाईप V||| हे सरकारी बंगले केवळ केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल यांनाच देण्याची देण्याचा नियम आहे. यात राघव चढ्ढा बसतच नाहीत. पण सध्या राघव चढ्ढा बंगला खाली करण्याच्या विरोधात कोर्टाची स्थगिती आणली आहे.

पण त्या पलीकडे जाऊन ते ज्या आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आहेत, त्या आम आदमी पार्टीने सुरुवातीला कुठल्याही नेत्यांना सरकारी बंगला, सोयी सुविधा, गाडी नको असल्याचे म्हटले होते. अरविंद केजरीवाल तर मुख्यमंत्री झाल्यानंतर डोक्याला आम आदमी पार्टीचे टोपी, गळ्यात मफरल घालून त्यांच्या खाजगी व्हॅगन आर मधून फिरत होते.

पण दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आणि अरविंद केजरीवाल देखील हाय प्रोफाईल मुख्यमंत्री बनले. त्यांनी बंगल्याच्या सजावटीवर दिल्ली सरकारच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च केले. आता त्यांचेच राजकीय वारे त्यांच्या खासदारांना लागले आहे. त्यातूनच “सरकारी बंगला नको” अशी सुरुवात करणारे आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आता “मोठाच बंगला पाहिजे” या हट्टावर अडून बसले आहेत.

AAP’s Raghav Chadha loses bungalow he got above his grade, takes RS Secretariat to court

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात