विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने पंजाब, गोव्यापाठोपाठ उत्तर प्रदेशसाठीही मोफत विजेची घोषणा केली आहे. सत्तेवर आल्यास प्रत्येक घरात ३०० युनिट वीज मोफत देण्याचे व थकीत देयके माफ करण्याचेही जाहीर करण्यात आले. AAP will provide free light in UP
आपच्या या आश्वासनामुळे उत्तर प्रदेशातील प्रचाराता हा नवा मुद्दा येणार आहे. आपला दिल्लीत मिळालेल्या यशामध्ये मोफत विजेच्या घोषणेचा महत्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशात हा मुद्दा पक्षाला किती फायद्यात ठरेल, तसेच यावर भाजपची प्रतिक्रिया काय असेल याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मतदारांच्या ताकदीच्या जोरावर महागड्या विजेचे दिवस संपुष्टात आणू. आमचा पक्ष सत्तेवर येताच २४ तासांत सर्व राज्यातील सर्व स्थानिक ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत मिळेल. शेतकऱ्यांसाठी वीजेचा वापर मोफत असेल. २१व्या शतकातील उत्तर प्रदेशला पूर्ण वेळ वीज मिळेल याचीही आम्ही खात्री करू. या राज्याकडे वीजनिर्मितीची साधने आहेत. या क्षमतेच्या बाबतीत त्यांची स्थिती दिल्लीसारखी नाही.
AAP will provide free light in UP
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App