पंजाबप्रमाणे उत्तराखंडमध्ये मतदारांना केजरीवाल यांनी दिले मोफत विजेचे आश्वासन


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : आम आदमी पक्षाने उत्तराखंडसाठीही मोफत विजेचे आश्वासन दिले आहे. आप सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट वीज मोफत मिळेल, अशी घोषणा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या या राज्यात भाजपची सत्ता आहे.
ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी दिल्लीचे राज्यही तोट्यात होते, पण आता फायद्यात असल्याचा महालेखापालांचा अहवाल सांगतो. मोफत विजेसाठी फक्त बाराशे कोटी रुपये खर्च येतो. अंदाजपत्रक ५० हजार कोटी रुपयांचे आहे. AAP will give free power in Uttarakhandयाआधी गेल्या महिन्यात पंजाबसाठी केजरीवाल यांनी अशीच घोषणा केली होती. ते म्हणाले, अनेक ठिकाणी लोकांना भरमसाठ बिले आली आहेत. एका व्यक्तीला ६० हजार रुपयांचे बिल आले. त्यात दुरुस्ती करण्यासाठी तो जातो. तेव्हा दहा हजार रुपये भरल्यास उरलेले बिल माफ असे त्याला सांगितले जाते. त्यामुळे त्याची फरफट होते. चुकीच्या बिलांचे प्रमाण इतके प्रचंड आहे की संपूर्ण यंत्रणाही हा घोळ सावरू शकणार नाही.

AAP will give free power in Uttarakhand

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती