लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावतोय;  तब्बल ४५०० फूट व्यासाचा १.४ किलोमीटर रुंदीचा


न्यूयॉर्क : एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्यामुळे काहीशी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. अर्थात हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून आज रात्री जाणार आहे. तब्बल ४५०० फूट व्यासाचा आणि १.४ किलोमीटर रुंदीच हा लघुग्रह आहे. A new asteroid, approximately 4,500 feet in diameter, is approaching the Earth and will come close to our planet on August 21, at night.

ताशी ९४ हजार १०८ किलोमीटर वेगाने तो २१ ऑगस्ट रोजी रात्री पृथ्वीच्या अधिक जवळ येईल, असा अंदाज खगोलाशास्त्रज्ञानी वर्तविला आहे.
नासाने या लघुग्रहाचे नामकरण 2016 AJ193, असे केले आहे. त्याला ‘संभाव्य धोकादायक’ यादीत टाकले आहे. घाबरण्याचे कारण नाही. कारण हा लघुग्रह पृथ्वी आणि चंद्राच्या ९ पट अंतरावरुन पृथ्वी पार करणार आहे. हा लघुग्रह ९४२०८ किलोमीटर प्रति तास अशा प्रचंड वेगाने प्रवास करतोय. १.४ किलोमीटर रुंदीचा हा लघुग्रह असून तो दुर्बिणीतून पाहता येणे शक्य असल्याने खगोलशास्त्रज्ञामध्ये त्यांच्याबाबत उत्सुकता आहे.

हा लघुग्रह यानंतर २०६३ मध्ये पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल. हवाईच्या हॅलेकला वेधशाळेत असलेल्या पॅनोरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टीम (पॅन-स्टार) सुविधेद्वारे हे लघुग्रह पहिल्यांदा जानेवारी २०१६ मध्ये प्रथम दिसला. हा लघुग्रह काळा आणि अपारदर्शक आहे. दर ५.९ वर्षांनी सूर्याभोवती फिरतो आणि पृथ्वी ग्रहाच्या जवळ येतो, तथापि, नंतर तो गुरुग्रहाच्या कक्षे पलीकडे प्रवास करतो.

अवाढव्य लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावतोय

लघुग्रह पृथ्वीच्या जवळून आज रात्री जाणार

नासाकडून लघुग्रहाचे नामकरण 2016 AJ193

लघुग्रह ‘संभाव्य धोकादायक’ यादीत समाविष्ट

खगोलशास्त्रज्ञामध्ये या घटनेबाबत मोठी उत्सुकता

पृथ्वी आणि चंद्राच्या ९ पट अंतरावरुन तो पृथ्वी पार करणार

A new asteroid, approximately 4,500 feet in diameter, is approaching the Earth and will come close to our planet on August 21, at night.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात