करोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाच्या सज्जतेचा आढावा घेतला जाणार
विशेष प्रतिनिधी
देशातील बहुतांश भागात करोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता, कठोर उपाययोजनांचा टप्पा परत येऊ लागला आहे. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे, तर अनेक राज्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर तपासण्यांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. A nationwide Covid19 preparedness drill in hospitals is being conducted today
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलीक्लिनिक आणि रुग्णालयांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, करोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याचे नियोजन आहे.
संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही करोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. त्याच वेळी, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह आढळलेले नमुने पाठवण्यासही सरकारी आदेशात सांगण्यात आले आहे.
दोन दिवस सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या तयारीची आढावा होणार –
करोना संसर्गामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉकड्रिल होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य विभागाचे प्रधान आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासोबत आढावा बैठकीत तयारी तपासण्याचे निर्देश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App