इंडिया गेट मध्ये नेताजींचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; पंतप्रधान मोदींचे ट्विट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती येत्या 23 जानेवारी रोजी आहे. या निमित्ताने इंडिया गेट परिसरात नेताजींच्या पूर्णाकृती पुतळा इंडिया गेट मध्ये उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. A full-sized statue of Netaji will be erected at India Gate; Prime Minister Modi’s tweet



पंतप्रधान मोदींनी या संदर्भातले ट्विट करून तपशीलवार माहिती दिली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुरता पुतळा ग्रॅनाईट मध्ये घडवण्यात येईल आणि तो इंडिया गेट मध्ये उभारण्यात येईल, असे त्यांनी ट्विट मध्ये स्पष्ट केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अतुलनीय आहे.

संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या ऋणातून थोडेसे उतराई होण्यासाठी इंडिया गेट मध्ये सन्मानपूर्वक हा पुतळा उभारण्यात येईल, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नेताजींचा पुतळा कसा असेल आणि तो कशा स्वरूपात उभारण्यात येईल याचे मानचित्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे.

A full-sized statue of Netaji will be erected at India Gate; Prime Minister Modi’s tweet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात