संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करण्यासाठी तसेच समाजातील शांतता बिघडवण्यासाठी, हिंदू-मुस्लीम वाद निर्माण होण्यासाठी काही समाजकंटकांकडून सध्या सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पत्रक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली प्रसारित करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर सरसंघचालक यांचं अतिगोपनीय कथन असं सांगून अधिक प्रसारित केलं जावं, अस ही यामध्ये सुरुवातीलच नमूद करण्या आलं आहे. तर हे पत्रक पूर्णपणे खोटे असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. A fake leaflet viral on social media in the name of Rashtriya Swayamsevak Sangh
ब्रिटिश राजदूताने ‘शोले’ ऐवजी लिहिले ‘छोले’ अन् यूजर्स साधली संधी, अखेर…
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे हे पत्रक पूर्णपणे खोटे आहे.’’ असं ट्वीट करत संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी ते खोटे पत्रक ट्वीट केलं आहे.
पत्रकात नेमकं काय आहे? –
बनावट पत्रकात ‘’जसं की तुम्ही सर्वजण जाणता, आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दरवर्षी दहा लाख मुस्लीम तरुणींना परत आणण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. ज्या अंतर्गत सर्व हिंदू मुलं जास्तीत जास्त इस्लाममधून धर्मांतरण करून हिंदू धर्मात आणण्यासाठी काम करतील. ज्यासाठी तुम्हा सर्वांना १५ दिवसांचं प्रशिक्षिण दिलं जाईल. ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, की मुस्लीम मुलींना त्यांच्या धर्मातून कसं सोडवलं जाईल आणि हिंदू धर्मात घरवापसी कशी करता येईल?’’ असं सुरूवातीस म्हटलं आहे.
“ यह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नाम पर सोशल मीडिया में चल रहा पत्रक पूर्णतः झूठा है। “ pic.twitter.com/njcZxm7YOH — Sunil Ambekar (@SunilAmbekarM) April 11, 2023
“ यह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नाम पर सोशल मीडिया में चल रहा पत्रक पूर्णतः झूठा है। “ pic.twitter.com/njcZxm7YOH
— Sunil Ambekar (@SunilAmbekarM) April 11, 2023
याशिवाय ‘’आपला उद्देश केवळ मुस्लीम मुलींना हिंदू धर्मात आणणे आहे. कारण, एक मुलगी येणाऱ्या पिढीला हिंदू बनवू शकते. एक मुस्लीम मुलगी मुस्लीम मुलांना जन्म देते, आणि ती जेव्हा हिंदू धर्मात परिवर्तित होते तर तिने जन्म दिलेलं प्रत्येक मूल हे हिंदू असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही एखाद्या मुस्लीम मुलीस इस्लाम सोडण्यास मजबूर करू शकतात.’’असंही पत्रकात नमूद असून खाली काही मुद्दे देण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App