विशेष प्रतिनिधी
अमृतसर : काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी घरी आमदारांना आमंत्रित केले. किमान ६२ आमदार त्यावेळी उपस्थित होते. 62 MLA came at sidhus residence
सिद्धू यांनी आज ऐतिहासिक सुवर्णमंदिराला भेट दिली तेव्हा अनेक आमदार त्यांच्याबरोबर होते. अमरिंदर यांची भूमिका अजूनही ताठर असून सिद्धू यांनी आपली जाहीर माफी मागावी या मागणीवरही ते ठाम आहेत.
सिद्धू यांच्या गटातील आमदारांनीच अमरिंदर यांना प्रत्यूत्तर दिले. सिद्धू यांनी माफी मागण्याची गरज नसल्याचे अनेक आमदारांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, सिद्धू शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंडीगड येथील काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. कार्याध्यक्ष कुलजीतसिंग नाग्रा यांनी ही माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App