5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या


वृत्तसंस्था

अहमदाबाद : 4.0 क्रांतीतून एक दशक नव्हे, तर संपूर्ण 21 वे शतक भारताचे असेल. काही दिवसांपूर्वी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची काही लोक चेष्टा करायचे, पण ही संकल्पना आता अस्तित्वात आली असून त्याद्वारेच भारत 4.0 क्रांतीतून केवळ पुढचे दशकच नव्हे, तर पुढचे शतक भारताचे असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 5GLaunch : 21st Century India through 4.0 Revolution; Trust PM Modi

देशातील 5G सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑल इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये झाले, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले :

  • आम्ही चार स्तंभांचा विचार केला आहे. चार दिशांवर एकाच वेळी फोकस केला आहे. प्रथम डिव्हाइसची किंमत दुसरी डिजिटल कनेक्टिव्हिटी तिसरा तिसरी डेट डेटाची किंमत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे “डिजिटल फर्स्ट” या संकल्पनेचा विचार यावर आधारित 4.0 क्रांतीतूनच पुढचे संपूर्ण शतक भारताचे असेल, असा आम्हाला विश्वास वाटतो
  •  डिव्हाइसची किंमत याचा विचार करताना किंमत तेव्हाच कमी होईल, जेव्हा खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर बनेल. 2014 पर्यंत भारतात 100% मोबाईल फोन आयात होत होते. परंतु भारतात मोबाईल उत्पादन युनिट वाढल्याबरोबर त्याच्या किमती कमी व्हायला सुरुवात झाली. मोबाईल उत्पादन युनिटची संख्या 2 वरून 200 वर पोहोचली. याचा परिणाम भविष्यातही दिसणार आहे.
  • डिजिटल कनेक्टिव्हिटीवर देखील सरकारने विचार केला आहे. 2014 पर्यंत फक्त 6 कोटी लोक ब्रॉडबँडशी कनेक्टेड होते. इंटरनेट कनेक्शन 25 करोड लोकांपर्यंत पोहोचले होते. आता ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी 80 कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे, तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी 85 कोटी लोकांपर्यंत पोहोचत आहे.
  • “सर्वांसाठी इंटरनेट” हे सरकारचे लक्ष्य आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी बरोबरच डेटाची किंमत याला देखील तितकेच महत्त्व आहे. डेटाची किंमत जितकी कमी राहील, तितकी देशात डिजिटल क्रांती जवळ येईल. टेलिकॉम क्षेत्रातले जे अनेक अडथळे होते, ते केंद्र सरकारने दूर केल्याने यामध्ये खूप फरक पडला आहे
  • – शेती, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, करमणूक, अवकाश या सर्व क्षेत्रांना 4.0 ही क्रांती व्यापून उरली आहे.

नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या

देशात 5 जी सेवेचे उद्घाटन झाल्यावर वेगवेगळ्या कंपन्या सेवेसाठी सरसावल्या आहेत. रिलायन्स डिजिटलचे प्रमुख आकाश अंबानी यांनी येत्या डिसेंबर पर्यंत रिलायन्स जिओ संपूर्ण भारतभर सेवा सुरू करेल, असे जाहीर केले आहे, तर वोडाफोन आयडियाचे बिर्ला यांनी स्वस्तात सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. रिलायन्स जिओने स्वस्तातला 5 जी फोन देखील लॉन्च केला आहे.

5GLaunch : 21st Century India through 4.0 Revolution; Trust PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात