5G स्पेक्ट्रमचा लिलाव : आज 5वी फेरी, अंबानी-अदानींसह 4 कंपन्या मैदानात


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 5G स्पेक्ट्रमची पहिल्या दिवसाचा ऑनलाईन लिलाव संपला. मंगळवारी लिलावाच्या एकूण 4 फेऱ्या झाल्या. आता बुधवारी लिलावाची 5 वी फेरी होईल. बोलीची प्रक्रिया सकाळी 10 वा. सुरू झाली होती. त्यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया व अदानी डेटा नेटवर्क्सने सहभाग घेतला होता.5G spectrum auction 5th round today, 4 companies in fray including Ambani-Adani

लिलावाचे दिवस किती असतील हे रेडियो व्हेव्सची खरी मागणी आणि वैयक्तिक बोली लावणाऱ्यांच्या धोरणावर अवलंबून असेल. लिलावादरम्यान 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72 GHz स्पेक्ट्रम ब्लॉकवर ठेवले जातील, असे दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.



याची वैधता ही 20 वर्षे असणार आहे. हा लिलाव लो फ्रिक्वेन्सी बँड, मीडियम आणि हाय बँडमध्ये होणार आहेत. या लिलावात यशस्वी ठरलेली कंपनी याद्वारे 5G सेवा देऊ शकणार आहे. सध्याच्या 4G सेवेपेक्षा ही 10 पट वेगवान असेल.

रिलायन्सच्या अदानीपेक्षा 140 पट जास्त ठेवी

अलीकडे, 5G स्पेक्ट्रम लिलावात सहभागी होण्यासाठी, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्सने बयाणा ठेवी जमा केले होते. भारती एअरटेलच्या 2.5 पट आणि व्होडाफोन आयडियापेक्षा 6.3 पट अधिक ठेवी ठेवल्यावरुन रिलायन्सचा हेतू स्पष्ट होते. अडाणी डेटा नेटवर्क्सने जमा केलेल्या रकमेपेक्षा रिलायन्सची रक्कम 140 पट जास्त आहे.

अदानींकडून 100 कोटी जमा

टेलिकॉम विभागाच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या पूर्व-पात्र बोलीदारांच्या यादीनुसार, व्होडाफोन, आयडियाने 2,200 कोटी रुपये, भारती एअरटेलने 5,500 कोटी रुपये, अडाणी डेटा नेटवर्क्सने 100 कोटी रुपये, रिलायन्स जिओने 14000 कोटी रुपये जमा केले आहेत. यावरुन अदानी हे लिलावादरम्यान कमी किमतीच्या स्पेक्ट्रमसाठीच बोली लावणार असल्याचे दिसून येते.

जिओकडे सर्वोच्च पात्रता गुण

14,000 कोटी रुपयांच्या EMD सह लिलावासाठी जिओला वाटप करण्यात आलेले पात्रता गुण 1,59,830 आहेत. हे चार बोलीदारांमध्ये सर्वाधिक आहेत. सामान्यतः EMD रक्कम ही लिलावामध्ये उतरलेल्या कंपन्यांची भूक, रणनीती आणि स्पेक्ट्रम घेण्याच्या योजनेचे संकेत देते. एअरटेलचे पात्रता गुण 66,330 आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे 29,370 आहेत. अदानीला त्याच्या ठेवींच्या आधारे 1,650 गुण मिळाले आहेत.

या कंपन्यांचे लिलावात वर्चस्व

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अडाणी समूह या प्रमुख कंपन्या लिलावात वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. या चार कंपन्यांनी मिळून 21,800 कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे त्यांना 2.3 ट्रिलियन (एकूण रकमेच्या 53%) किमतीच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावता येईल. उद्योग विश्लेषकांनी सांगितले की, दूरसंचार सेवा प्रदाते लिलावासाठी ठेवलेल्या सर्व बँडमध्ये आक्रमकपणे बोली लावण्याची शक्यता नाही.

5G spectrum auction 5th round today, 4 companies in fray including Ambani-Adani

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात