आसाम सरकारने हा निर्णय घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी आसाम मधील भाजप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करेल. 5 lakh rupees will be available for intercaste marriage, Assam government has decided
अनुसूचित जाती कल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत (Inter Caste Marriage Plan) कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी किंवा कोणताही उत्पन्न देणारा प्रकल्प सुरू करण्यासाठी 10,000 ते 5 लाख रुपये दिले जातील.
अधिकाऱ्याच्या मते, योजनेच्या लाभार्थीचे लग्न एप्रिल 2019 ते मार्च 2021 दरम्यान झालेले असावे आणि जोडप्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी एक अट अशी आहे की पती किंवा पत्नीपैकी एक अनुसूचित जातीचा आणि दुसरा सामान्य जातीचा असावा.
दरम्यान, अनेकप्रसंगी असे दिसून आले आहे की कुटुंबे आंतरजातीय विवाह नाकारतात, ज्यामुळे आत्महत्येसह अनेक समस्या उद्भवतात. अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेमुळे राज्यात सुसंवाद, सकारात्मक मानसिकता आणि सामाजिक सलोखा भावना वाढीस लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App