वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर विकासाचे परिमाण बदलले असून देशभरातील 34 नागरिकांनी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी केल्या आहेत. 370 Removal Impact jammu kashmir
370 आणि 35 ए कलमे हटवण्यापूर्वी जम्मू काश्मीर राज्यात बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला जमीन अथवा मालमत्ता खरेदीची कायदेशीर परवानगी नव्हती. परंतु, आता 370कलम हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढली असून जम्मू-काश्मीरच्या जम्मू, रेसाई, गंदरबाल, उधमपूर या जिल्ह्यांमध्ये देशभरातील 34 नागरिकांनी बिगर शेत जमीन मालमत्ता खरेदी करून गुंतवणूक केली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. मालमत्ता खरेदी करणारे हे नेमके लोक कोण आहेत आणि त्यांनी किती मालमत्ता खरेदी केली आहे, याचे तपशील मात्र त्यांनी सादर केलेले नाहीत.
पंतप्रधानांनी सांगितला पाच ऑगस्टचा महिमा…हॉकी मेडल मिळाले, राम मंदिराच्या निर्माणाला सुरूवात झाली आणि काश्मीरमधून कलम ३७० हटले
– गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन
जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढावी या हेतूने अनेक सोयीसुविधा केंद्रशासित प्रदेश आणि जाहीर केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती काही फर्म जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्या देशातील एका शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन तेथे गुंतवणुकीबाबत काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याची सुरुवात 25000 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारापासून म झाली आहे.
या पार्श्वभूमीवर देशातील अन्य राज्यांमधील नागरिक देखील गुंतवणुकीच्या दृष्टीने जम्मू-काश्मीर कडे पाहात असून 34 नागरिकांनी तेथे बिगर शेती जमीन खरेदी केल्याचे नित्यानंद राय यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App