कोरोनाच्या नैराश्यातून रोज ३१ मुलांच्या आत्महत्या; नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात स्पष्ट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी ३१ मुलांनी (१८ वर्षे वयाखालील) आत्महत्या केल्या आहेत. कोरोनाच्या मानसिक ताणातूनआलेल्या नैराश्यातून या मुलांनी आत्महत्या केल्या असाव्यात असा अंदाज काढण्यात आला आहे. 31 children to commit suicide every day due to mental stress in Corona Pandemic

याबाबतची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातून उघड झाली आहे. त्यावर्षी ११,३९६ मुलांनी आत्महत्या केली. त्यात ५,३९२ मुले व ६००४ मुली होत्या. त्यातील अनेक मुलांनी कोरोनाच्या मानसिक तणावातून आत्महत्या केल्या असाव्यात,असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

या अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये देशात ११.३९६ मुलांनी आत्महत्या केली. २०१९ मध्ये ९६१३ मुलांनी आत्महत्या केली होती. २०१८ मध्ये हाच आकडा ९,४१३ होता. २०२० मध्ये २०१९ पेक्षा १८ टक्क्यांनी व २०१८ पेक्षा २१ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी कौटुंबिक समस्यांपायी ४,००६, प्रेमप्रकरणातून १,३३७, आजारी असल्याने १,३२७ जणांनी आत्महत्या केल्या. अन्य कृत्यामागे बेकारी, दिवाळखोरी, व्यंधत्व, अमली पदार्थांचे सेवन अशी इतर कारणे होती.



सेव्ह द चिल्ड्रनचे उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितले की, कोरोनाची साथ तसेच त्यामुळे शाळा बंद असणे अशा गोष्टींमुळे मुलांना विलक्षण एकाकीपणा जाणवू लागला होता.

शाळा बंद असल्याने एकाकीपणा

कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने अनेक मुलांना घरीच राहावे लागले. त्यांचा मित्र, शिक्षक किंवा अन्य व्यक्तींबरोबरचा संवादच खुंटला होता.त्यामुळे एक प्रकारचा एकाकीपणा आला. त्यामुळेही मानसिक तणाव असह्य होऊन अनेक मुलांनी आत्महत्या केली असे बालकल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांचे मत आहे.

31 children to commit suicide every day due to mental stress in Corona Pandemic

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात