वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 25 रुग्णांनी ऑक्सिजनच्या अभावी आज जीव गमावला आहे. अजूनही 60 रुग्णांचा जीव धोक्यात आहे.25 corona patients die due to lack of oxygen; Incident at Sir Gangaram Hospital in Delhi
सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ऑक्सिजनचा पुरवठा काही तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशिन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे.गुरुवारी GTB रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला.
त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. पण वेळेत ऑक्सिजनचा टँकर पोचल्याने रुग्णांचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App