विशेष प्रतिनिधी
काबूल – अमेरिकेची घरवापसी मोहीम ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली असली तरी अफगाणिस्तानात अजूनही १०० ते २०० नागरिक असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी दिली. ते म्हणाले अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्यांकांसह स्थानिक नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे200 US citizens stucked in Afghanistan
आणि सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याची जबाबदारी पार पाडूनच तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि समर्थन मिळवावे लागेल. अमेरिका आता कतार येथून अफगाणिस्तानशी राजनैतिक मोहीम सुरू ठेवेल. काबूलमधील दूतावास कतारला स्थलांतरित करण्यात आलेअसून आहे.
दरम्यान, ३१ ऑगस्टपर्यंत तब्बल ६ हजार अमेरिकी नागरिकांसह १ लाख २३ हजारांहून अधिक जणांना अफगाणिस्तानातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याचे ब्लिंकन म्हणाले.
अफगाणिस्तानात राज्य करायचे असेल तर तालिबानला नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि हक्काची जपवणूक करावी लागेल आणि ती जबाबदारी पार पाडावी लागेल. महिला आणि अल्पसंख्यांकांसह अफगाण नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करावे लागणार आहे. दहशतवादाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App