मायक्रोसॉफ्ट मधून 10000 कर्मचाऱ्यांची कपात, पण सर्वांना सुविधा आणि आरोग्य सेवा; सत्या नडेलांचा ईमेल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरामध्ये आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. आता यामध्ये Microsoft कंपनीचा देखील समावेश झाला आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. आर्थिक मंदीमुळे २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये १०,००० कमर्चाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा आणि आरोग्य सेवा कंपनी पुरवणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे.  10000 employees cut from Microsoft

काही लहान पोस्टच्या नोकऱ्यांमध्ये कपात करणार असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्पष्ट केले होते. कंपनीला कोरोना महामारीनंतर आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे विंडोज आणि त्यासोबत असणाऱ्या सॉफ्टवेअरची मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या अखेरीस कंपनीकडे सुमारे २,२१,००० कर्मचारी होते. त्यातील १,२२,००० हे अमेरिका आणि इतर देशांमधील होते. पण आर्थिक मंदीमुळे सुरु असणारी टाळेबंदी यामुळे टेक क्षेत्रात अनेक कंपन्या कर्मचारी कपात करणार आहेत. सत्या नडेला यांनीही महामारीनंतर पुढील दोन वर्षे या क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा दिला होता. त्यातून कर्मचारी कपात होते आहे.

सत्या नडेलांचा कर्मचाऱ्यांना ईमेल

सत्या नडेला यांनी याबद्दल कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे. यात त्यांनी सध्यस्थिती आणि भविष्यातील अंदाज यावर भाष्य केले आहे. हा काळ प्रत्येकासाठी खूप आव्हानात्मक आहे. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. काही कर्मचाऱ्यांची कपात नक्कीच केली जात आहे. मात्र कंपनीचे महत्वाचे प्रकल्प जिथे चालू आहेत तिथे नोकरभरती सुरू राहील, असे सत्या नडेला यांनी म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण सन्मान मिळावा आणि आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात याची काळजी घेतली जाणार आहे अशी माहिती नडेला यांनी दिली. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांसाठी आरोग्यसेवा दिली जाणार आहे.

मायक्रोसॉफ्ट आधीच ChatGPT, Dall-E च्या मागे असलेल्या OpenAI मध्ये आणखी १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची चर्चा करत आहे. खरे तर Azure OpenAI सेवांचा भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट त्याच्या Azure ग्राहकांना ChatGPT ऑफर करण्यास सुरुवात करणार आहे, असे नडेला यांनी नमूद केले.

10000 employees cut from Microsoft

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात