छत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; IED स्फोटात १० जवान शहीद, एका चालकाचाही मृत्यू!

मोहिमेनंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी अरणपूर रोडवर आयईडीचा स्फोट घडवून आणला

विशेष प्रतिनिधी

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आज (बुधवार) नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटामुळे दहा जवान शहीद झाले. तसेच एका चालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 10 DRG jawans and one civilian driver lost their lives in an IED attack by naxals in Dantewada

मिळालेल्या माहितीनुसार, अरणपूर पोलीस स्टेशन परिसरात माओवादी कॅडर असल्याच्या माहितीवरून दंतेवाडा येथून डीआरजी फोर्स नक्षलविरोधी अभियानासाठी पाठवण्यात आले होते. मोहिमेनंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी अरणपूर रोडवर आयईडीचा स्फोट घडवून आणला. ज्या वाहनातून सैनिक या भागात गेले होते, ते वाहन उडवून देण्यात आले. शहीद जवानांचे मृतदेहही विखुरलेले दिसले. नक्षलवाद्यांनी ज्या ठिकाणी हल्ला केला त्या ठिकाणी एक मोठे खड्डे दिसून आले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.  अलीकडच्या काळात सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत होती. तरीही नक्षलवाद्यांकडूनही सातत्याने हल्ले केले जात आहेत. गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर आयईडीच्या स्फोटात विजापूरमध्ये एक CAF जवान शहीद झाला होता.

10 DRG jawans and one civilian driver lost their lives in an IED attack by naxals in Dantewada

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात