दिल्ली, पाटणा, फुलवारी शरीफ मध्ये ईडीचे छापे; 1.5 किलो सोने, 1 कोटी कॅश आणि बरेच काही!!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, राबडीदेवी विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या तीन बहिणी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या माजी आमदारांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांवर घातलेल्या छाप्यांमध्ये सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीला 1.5 किलो सोने, 1 कोटी रुपये कॅश, काही अमेरिकन डॉलर्स आणि बरीच कागदपत्रे सापडली आहेतच.1 cr unaccounted cash, 600 cr crime proceeds found in raids on Lalu family
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तब्बल 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे धागेदोरे ईडीच्या अधिकाऱ्यांना या छाप्यांमध्ये आढळले आहेत. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराने रियल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकी याच पैशातून केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात आढळले आहे. या 600 कोटींच्या घोटाळ्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने तपास पुढे सुरू केला आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकृत सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराच्या विविध मालमत्तांवर ईडीने छापे घातले आहेत. या छापांची कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. परंतु या छाप्यांमध्ये नेमके काय आढळले याच्या बातम्या बाहेर आल्या नव्हत्या. त्या बातम्या आता बाहेर आल्या आहेत. लालूप्रसादांच्या परिवाराच्या दिल्ली, पाटण्यामध्ये विविध ठिकाणी घरे बंगले मालमत्ता आहेत. रियल इस्टेट मध्ये त्यांच्या प्रचंड गुंतवणूकी आहेत. दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी तेजस्वी यादव यांचे घर आहे. तिथल्या छाप्यांच्या वेळी स्वतः तेजस्वी यादव घरात हजर होते.
या सर्वांवर ईडीची कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्येच 1.5 किलो सोने, सोन्याचे दागिने, 1 कोटी रुपये कॅश काही अमेरिकी डॉलर्स, काही महत्त्वाची कागदपत्रे एवढा ऐवज अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे. या संदर्भात तेजस्वी यादव आणि त्यांच्या तीन बहिणींची ईडीचे अधिकारी चौकशी देखील करणार आहेत. चंदा यादव, रागिणी यादव आणि हेमा यादव अशी या तीन बहिणींची नावे आहेत. या तिघींच्याही निवासस्थानांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे घातलेच आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार सय्यद अबू दोजना आणि अमित खात्याल यांच्याही घरांवर अधिकाऱ्यांनी त्याचवेळी छापे घातले आहेत.
काँग्रेसचा संताप
लालूप्रसाद यादव यांच्या परिवारावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. लालूप्रसाद सध्या किडनीच्या विकाराने आजारी आहेत. पण तरी देखील त्यांना सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून मोदी सरकार त्रास देत आहे, असे टीकास्त्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले आहे. पण लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराच्या मालमत्तांवरच्या छाप्यांमध्ये 1.5 किलो सोने, 1 कोटी रुपये कॅश, काही अमेरिकी डॉलर्स आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सापडण्याच्या मुद्द्यावर मात्र काँग्रेस सह सगळ्याच राजकीय पक्षांनी थेट उत्तर न देता मौन पाळणे पसंत केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App