प्रतिनिधी
चंदीगड : झी मीडिया कॉर्पोरेशनने झी पंजाब/हरियाणा/हिमाचलचे संपादक जगदीप सिंग संधू यांची पंजाब विधानसभा निवडणुकी दरम्यान ‘राजकीय पक्षाशी अनैतिक व्यवहार’ केल्याच्या आरोपावरून सेवा समाप्त केली. अधिकृत निवेदनात, कंपनीने म्हटले आहे की त्यांची सेवा 28 मार्चपासून तत्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहे. Zee Punjab editor Jagdeep Sandhu Expulsion Consequences of allying with a political party
कंपनीने निवेदनात असे म्हटले आहे की, या सूचनेद्वारे, संबंधितांना आणि जनतेला याद्वारे सूचित केले जाते की जगदीप सिंग संधू, शेवटचा ज्ञात निवास पत्ता – सेक्टर ९१ मोहाली १६००६२ , जे झी पंजाब हरियाणा हिमाचल’ या वाहिनीचे कर्मचारी आणि संपादक आहेत. मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २८ मार्च पासून त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.
हे झी मीडियाच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की जगदीप सिंग संधू यांनी दोन तीन महिन्यांपूर्वी पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार्या एका राजकीय पक्षाशी कथितपणे गुप्त समझोता केला होता.
त्यात पुढे असेही म्हटले की, सिंह हे त्या राजकीय पक्षाच्या बाजूने Zee PHH वर पक्षपाती वार्तांकन करत होते. त्यांनी कंपनीच्या धोरणांना डोळ्यांआड केले. जी नेहमीच तटस्थता आणि निःपक्षपातीपणाची हमी देतात. सिंग यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे वचन देण्यात आले. त्यामुळे त्यांनी पक्षपाती वार्तांकन केले.
पार्टी मागे पडल्याने जगदीपचे भांडे फुटले
कंपनीने निवेदनात नमूद केले आहे की संधू आणि अनामिक राजकीय पक्ष यांच्यातील करार तेव्हा उघडकीस आला जेव्हा पक्षाने वचन पूर्ण केले नाही. तो मागे पडला. कंपनीने म्हटले आहे की, जगदीप झी मीडियाच्या व्यवस्थापनासमोर उघड झाले. कारण त्यांना अचानक या राजकीय पक्षाच्या विरोधात बातम्या प्रकाशित करण्यासाठी व्यवस्थापनाचे मन वळवायचे होते.
त्यात पुढे म्हटले आहे की, जगदीप संधू यांचे असे कृत्य केवळ बेकायदेशीर आणि अनैतिक पत्रकारितेचेच नाही तर ते नेटवर्कच्या दर्शकांची फसवणूक आणि दिशाभूल करणारे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App