विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : operation Sindoor च्या यशस्वी मोहिमे दरम्यान जगभरातल्या देशांमध्ये संदेश देण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात नेमका कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा नाही या मुद्द्यावरून वाद घालत असलेल्या विरोधी पक्षांना मोदी सरकारने एक बाण मारला आणि तो अचूक दोन पक्षांना बसला. Yusuf Pathan
काँग्रेस आणि शशी थरूर यांच्यातले संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने शशी थरूर यांची शिष्टमंडळाच्या नेतृत्व पदावर परस्पर निवड केली त्यामुळे काँग्रेसने चिडून शशी थरूर यांचा पत्ता आपल्या यादीतून कट केला पण म्हणून थरूर यांचे नाव सरकारने काढून टाकले नाही. उलट ते अधिक आक्रमकपणे मांडून ठेवले.
मोदी सरकारचा दुसरा बाण तृणमूळ काँग्रेसला लागला. सरकारने तृणमूळ काँग्रेसचा खासदार क्रिकेटपटू युसुफ पठाणची खासदारांच्या शिष्टमंडळात निवड केली. पण त्यामुळे तृणमूळ काँग्रेसचे नेते चिडले. मोदी सरकारने आमच्या खासदाराचे नाव परस्पर शिष्टमंडळाच्या यादीत समाविष्ट केलेच कसे??, असा सवाल करून तृणमूळ काँग्रेसने युसुफ पठाणचे नाव मागे घेतले. ममता बॅनर्जींचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी तसे जाहीर केले.
पण प्रत्यक्षात हा मोदी सरकारने तृणमूळ काँग्रेसला मारलेला हा “बाण” होता. कारण युसुफ पठाणची शिष्टमंडळ परस्पर निवड केल्यानंतर त्याचा पक्ष त्याचे नाव कट करणार याचा अंदाज सरकारला होता. हा तोच युसुफ पठाण आहे, ज्याने मुर्शिदाबाद मधल्या हिंदू हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी reels काढून ती आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली होती. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. मोदी सरकारने त्याचे नाव परस्पर शिष्टमंडळाच्या यादीत समाविष्ट करून त्याच्याच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून ते शिष्टमंडळाच्या यादीतून कट करून टाकले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App