विशेष प्रतिनिधी
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून देखील बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे उमेदवार युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतलाच नाही, ही धक्कादायक बाब आज समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे आमदार उत्तम जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचे सगळे खापर EVMs वर फोडले. त्याचा बराच मोठा राजकीय तमाशा महाराष्ट्रात रंगला. अगदी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकत्रित रित्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेण्याच्या बातम्या आल्या, पण नंतर मात्र सगळेच शमून विस्कळीत झाले.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयासंदर्भात वेगळाच सूर लावला. EVMs मध्ये कुठला घोळ असल्याचा पुरावा स्पष्ट दिसत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातून मी चार वेळा त्याच EVMs मधून निवडून आले. त्यामुळे EVMs विरोधात थेट काही बोलता येत नाही. त्यामुळे मी बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार याला फेरमतमोजणीचा अर्ज देखील मागे घ्यायला सांगितला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे युगेंद्र पवार यांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतला, असा आत्तापर्यंतचा समज महाराष्ट्रात पसरला.
पण हा समाज उत्तम जानकर यांनी दूर केला. ते शरद पवारांना आज बारामती मध्ये गोविंद बाकी देऊन भेटले. महाराष्ट्र दीडशे मतदारसंघांमध्ये EVMs घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे युगेंद्र पवार यांच्या विरोधात 20000 मतांनी पडल्याचा दावा केला.
युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या निवडणुकी विरोधात फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला, पण तो सुप्रिया सुळे यांनी त्यांना मागे घ्यायला लावला, असे उत्तम जानकर यांना लक्षात आणून देताच त्यांनी आपण युगेंद्र पवारांशी बोललो. शरद पवारांशी बोललो. युगेंद्र पवारांनी तो फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतलेला नाही, असे सांगितले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी सांगून देखील युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतला नसल्याचे स्पष्ट झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App