Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल

Hamas support

विशेष प्रतिनिधी

पुणे : Hamas support पुण्यातील कर्वेनगर परिसरात वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर वाटणाऱ्या काही तरुणांना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.Hamas support

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कर्वेनगर परिसरात हमासच्या समर्थनार्थ काही तरुण पोस्टर वाटत होते. स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्या तरुणांना विरोध केला. त्यानंतर त्या तरुणांना जमावाने चांगलाच चोप दिला. तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर देखील शेअर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधित तरुणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.



या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पोलिसांनी या तरुणांचा नेमका हेतू काय होता? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कृतीला सोडले जाणार नाही, अशा शब्दात पोलिसांनी दोन्ही बाजूंना सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यातील या आधीही अशा घटना

इस्त्रायली झेंड्यांचे पोस्टर रस्त्यांवर चिकटवणे

ऑक्टोबर 2023 मध्ये पुण्याच्या लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक या भागांतील रस्त्यांवर इस्त्रायली झेंड्यांचे पोस्टर चिकटवण्यात आले होते, ज्यावर पायांचे ठसेही आढळले. या प्रकरणी चार पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटवली असून, त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

FTII मधील ‘Remember Babri’ पोस्टर प्रकरण

जानेवारी 2024 मध्ये पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये ‘Remember Babri’ या पोस्टरवरून वाद निर्माण झाला होता. काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी कॅम्पसमध्ये घुसून पोस्टर जाळले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यानंतर, सात विद्यार्थ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हे नोंदवण्यात आले होते.

Youths distributing Hamas support posters beaten up by mob in Pune

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात