वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाने गावातील सुमारे १० जणांवर फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Youth attacks 10 with shovel; 3 killed
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर पोलीस स्टेशन हद्दीतील परवाना गावात सोमवारी सकाळी एका तरुणाने गावातील ८-१० जणांवर फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात ३ जण जागीच ठार झाले. तर इतर जखमींना गंभीर अवस्थेत उच्च वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. काही लोक आरोपी मंदबुध्दी असल्याचे सांगत आहेत, तर काही लोक त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत आहेत. मात्र, या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीओ सायना आणि एसपी सिटी घटनास्थळी तपास करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App